संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणदल प्रमुखांनी दिली डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनला भेट

Posted On: 19 JUL 2025 5:52PM by PIB Mumbai

 

संरक्षणदलप्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी 19 जुलै 2025 रोजी तामिळनाडूमधील वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजला भेट दिली. त्यांनी या महाविद्यालयातील 81व्या स्टाफ अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अधिकारी आणि वेलिंग्टन तळावरील अधिकाऱ्यांना संबोधित केले.

सीडीएसनी 'ऑपरेशन सिंदूर' वर विवेचन केले आणि भारतीय सशस्त्र दलांनी ही मोहीम यशस्वी करताना प्रदर्शित केलेल्या तिन्ही सेवांच्या समन्वयाच्या महत्त्वाच्या पैलूंवर भर दिला.

त्यानंतर, महाविद्यालयाच्या प्राध्यापकांशी संवाद साधताना, जनरल अनिल चौहान यांनी एकात्मिकता आणि संयुक्तपणाची अनिवार्यता, क्षमता विकास, आत्मनिर्भरता आणि लष्करात होत असलेल्या परिवर्तनकारी बदलांचे सखोल आकलन यावर भर दिला.

सीडीएसना  डीएसएससीचे (DSSC) कमांडंट लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षण उपक्रमांबद्दल माहिती दिली. या प्रशिक्षणात विशेषतः 'डीप पर्पल डिव्हिजन' च्या संस्थात्मकतेमुळे संयुक्तता आणि आंतर-सेवा जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात आहे.

सध्या महाविद्यालयात 45 आठवड्यांचा 81 वा कर्मचारी अभ्यासक्रम (Staff Course) सुरू आहे. या अभ्यासक्रमात 500 विद्यार्थी अधिकारी असून, त्यात 35 मित्र देशांमधील 45 अधिकारी देखील समाविष्ट आहेत.

***

माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2146190)