इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

10 लाख नागरिकांना मोफत एआय प्रशिक्षण मिळणार: ग्रामीण पातळीवरील उद्योजकांना (व्हीएलई) प्राधान्य दिले जाईल


एआय प्रशिक्षण, आयआरसीटीसी सेवा आणि राज्य एकात्मता यामुळे कॉमन सर्व्हिस सेंटर्सचे (सीएससी) जाळे अधिक मजबूत होईल: अश्विनी वैष्णव

Posted On: 16 JUL 2025 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (मेईटी) अंतर्गत येणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटर ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (सीएससी एसपीव्ही) ने नवी दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये डिजिटल इंडियाची 10 वर्षे साजरी केली. देशभरात परिवर्तन घडवणाऱ्या डिजिटल सक्षमीकरणाच्या दशकपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि या खात्याचे राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

अश्विनी वैष्णव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

मंत्र्यांनी केलेल्या प्रमुख घोषणा:

  • सर्व ग्रामीण पातळीवरील उद्योजकांना (व्हीएलईंना) प्राधान्य देऊन 10 लाख व्यक्तींना मोफत एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण.
  • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आयआरसीटीसी सेवा देण्यास सुरुवात करण्याचे सर्व व्हीएलईंना आवाहन केले.
  • राज्य आयटी एजन्सींना सीएससी-एसपीव्ही (विशेष उद्देश वाहन) शी एकत्रित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले.

  

10 लाख नागरिकांना मोफत एआय प्रशिक्षण मिळेल: ग्रामीण पातळीवरील उद्योजकांना (व्हीएलई) प्राधान्य दिले जाईल.

 

* * *

शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2145401) Visitor Counter : 2