गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे यमुना नदी पुनरुज्जीवनासाठी उच्चस्तरीय आढावा बैठक
Posted On:
11 JUL 2025 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे यमुना पुनरुज्जीवनासाठी उच्चस्तरीय आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.

या बैठकीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (डीपीसीसी) जल प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी तातडीने अॅक्शन मोड वर काम करावे. ते म्हणाले की, दिल्ली सरकारने औद्योगिक कारखान्यांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी सतत आणि प्रभावी पावले उचलावीत. अमित शहा म्हणाले की, दिल्ली व्यतिरिक्त, इतर राज्यांमधून येणाऱ्या कचऱ्याद्वारे यमुना नदीत रसायने येत आहेत, ही गोष्ट टाळण्यासाठी यमुना किना-यालगतच्या सर्व राज्यांनी मिळून यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी एकत्रितपणे काम करावे.
अमित शाहा यांनी यमुना नदी स्वच्छ करण्यावर तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची (एसटीपी) क्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला.
याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, दिल्लीमध्ये अनेक जलाशय आहेत, त्यामध्ये दिल्ली सरकारने पावसाचे पाणी गोळा करण्याची व्यवस्था करावी. ते पुढे म्हणाले की, या जलाशयांचा विकास केला तर, पर्यटनालाही चालना मिळेल.

अमित शहा यांनी यमुनेतील ई-प्रवाह म्हणजे नदीची मूळ पर्यावरणीय परिसंस्था आणि तिचे पाणी वापरता येण्यायोग्य व्हावे, यासाठी जलस्तर वाढवण्यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे असे सांगितले, तसेच या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारशी बोलण्याची आणि दिल्लीत प्रवेश करताना यमुनेचा प्रवाह सुधारण्यासाठी उपाय शोधण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, ओखला एसटीपीचे प्रक्रिया केलेले पाणी यमुनेच्या प्रवाहात सोडले गेले तर त्यामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144151)
Visitor Counter : 2