युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
‘नव भारता’ने फिट इंडिया संडेज् ऑन सायकल मोहिमेला पूर्ण बळ द्यावे, क्रीडामंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांचे आवाहन
Posted On:
10 JUL 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2025
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी फिट इंडिया संडेज् ऑन सायकल मोहिमेच्या 31व्या आवृत्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना या मोहिमेने धरलेला वेग पूर्ण ताकदीने वाढवित नेण्याचे आवाहन केले आहे. ही सायकल मोहीम देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांबरोबर 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
देशभरातील 6,000 हून अधिक ठिकाणी आयोजित या मोहिमेत सुमारे 50,000 लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. माजी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट चॅम्पियन आणि भारताचे एकमेव ‘हेवीवेट’ पदाचे विजेते द ग्रेट खली यांची उपस्थिती या आठवड्याअखेरीस आयोजित या मोहिमेचे एक विशेष आकर्षण ठरणार आहे. 7 फूट उंचीचे हे दिग्गज व्यक्तिमत्व दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर सायकल रॅलीचे नेतृत्व करणार असून त्यांच्यासोबत इतर मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
डॉ. मांडवीय म्हणाले, “डिसेंबर 2024 मध्ये सुरू झालेली ही सायकल मोहीम आज एक राष्ट्रीय फिटनेस क्रांती बनली आहे. ही मोहीम देशातील 11,000 हून अधिक ठिकाणी पोहोचली असून लाखो नागरिकांना प्रेरणादायक ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्थूलतामुक्त भारता’चे स्वप्न आम्ही सायकलच्या प्रत्येक पेडलसोबत पुढे नेत आहोत. फिट इंडिया संडेज् ऑन सायकल ही मोहीम नव्या भारताची ऊर्जा आणि संकल्पाचे प्रतिबिंब ठरेल. आपण सगळ्यांनी ‘विकसित भारता’च्या दिशेने आरोग्यदायी, बळकट आणि उत्साही वाटचाल सुरू ठेवूया.”
डॉ. मनसुख मांडविया यांनी डिसेंबर 2024 मध्ये सुरू केलेल्या फिट इंडिया संडेज् ऑन सायकल मोहिमेने महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाचे रूप घेतले आहे. ही मोहीम नागरिकांना सायकलचा वापर हा जीवनशैलीचा भाग म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहन करते. ताज्या आकडेवारीनुसार, या मोहिमेची व्याप्ती देशातील 11,000 हून अधिक ठिकाणी पोहोचली असून विविध वयोगटांतील 4 लाखांहून अधिक नागरिक यात सहभागी झाले आहेत.
फिट इंडिया संडेज् ऑन सायकल ही मोहीम युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने सायकलिंक फेडरेशन ऑफ इंडिया, माय भारत आणि योगासन भारत यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात येते. 2000 हून अधिक सायकलिंग क्लब्स या उपक्रमाचा भाग आहेत आणि दर रविवारी सक्रिय सहभाग घेतात.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143895)
Visitor Counter : 4