कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक आणि अति ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांसाठीच्या विशेष अभियान 2.0 दरम्यान पहिल्या आठवड्यात 1451 प्रकरणांचा निपटारा

Posted On: 07 JUL 2025 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2025


कुटुंब निवृत्तीवेतनधारक आणि अति ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘जीवनमानातील सुलभता’ आणण्याच्या उद्देशाने त्यांच्या तक्रारींचे वेळेवर आणि दर्जात्मक निवारण करण्यासाठी केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाने दिनांक 1 जुलै ते 31 जुलै, 2025 या कालावधीत विशेष अभियान 2.0 ची सुरुवात केली आहे. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिनांक 2 जुलै 2025 रोजी महिन्याभराच्या या विशेष अभियान 2.0 ची सुरुवात करून दिली.

अभियान-पूर्व टप्प्याचा भाग म्हणून संरक्षण, रेल्वे, केंद्रिय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील सीएपीएफएस इत्यादी विभागांमधील निवृत्तीवेतनधारकांसह 51 मंत्रालये/विभाग/संस्था यांच्याशी संबंधित 2,210  तक्रारी निश्चित करून सामायिक करण्यात आल्या.

संबंधित मंत्रालये/विभाग/संस्था, अधिदान आणि लेखा कार्यालये (पीएओएस), केंद्रीय निवृत्तीवेतन लेख कार्यालय (सीपीएओ), निवृत्तीवेतन वितरक बँका तसेच निवृत्तीवेतन धारक कल्याण संस्था यांच्यासह सर्व भागधारक या अभियानात सक्रियतेने सहभागी होत आहेत.

या सर्व भागधारकांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे आज 07 जुलै 2025 पर्यंत 2,210 पैकी 1,451 तक्रारींचे निवारण झाले असून त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होऊन केवळ 759 झाली आहे. या अभियानामुळे अनेक निवृत्तीवेतन धारकांच्या गेली कित्येक वर्षे प्रलंबित राहिलेल्या तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत.

विशेष अभियान 2.0 च्या यशस्वी पूर्ततेच्या उद्देशाने निश्चित केलेल्या सर्व प्रकरणांचे वेळेवर आणि दर्जेदार निराकरण सुनिश्चित करण्यासाठी विभाग एकूण प्रक्रियेच्या प्रगतीवर सक्रियतेने लक्ष ठेवून आहे.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2143007)