संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-जपान सागरी संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने जपानी तटरक्षक दलाच्या ‘इत्सूकुशिमा’ जहाजाचे चेन्नईत आगमन

Posted On: 07 JUL 2025 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2025


हिंद-प्रशांत परिसरात भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि जपानी तटरक्षक दल (जेसीजी)यांच्या दरम्यान धोरणात्मक भागीदारी बळकट करत, जपानी तटरक्षक दलाच्या जागतिक महासागरी प्रवास प्रशिक्षणाचा भाग म्हणून, कॅप्टन नाओकी मिझोगुची यांच्या नेतृत्वाखालील ‘इत्सूकुशिमा’ या जपानी तटरक्षक दलाच्या जहाजाचे आज, 07 जुलै 2025 रोजी चेन्नई बंदरात आगमन झाले. या बंदरात हे जहाज एक आठवडाभर थांबणार असून या काळात उच्च-स्तरीय द्विपक्षीय बैठका, संयुक्त व्यावसायिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि दोन्ही दलांतील आंतर परिचालन क्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने सागरी सराव हे कार्यक्रम होणार आहेत.

या कालावधीदरम्यान पाहुण्या जहाजावरील कर्मचारी सदस्य आणि भारतीय तटरक्षक दलाचे कर्मचारी सौजन्य भेटी, परस्परांच्या जहाजांना भेटी, संयुक्त प्रशिक्षण सत्रे, योग आणि क्रीडाविषयक कार्यक्रम  अशा विविध उपक्रमांमध्ये भाग घेतील आणि 12 जुलै 2025 रोजी होणाऱ्या ‘जा माता’(पुन्हा भेटूया) या संयुक्त सागरी सरावानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल.

वाढत्या सहकार्याचे प्रतीक म्हणून चार आयसीजी अधिकारी सी रायडर्स म्हणून ‘इत्सूकुशिमा’ जहाजासोबत सिंगापूरपर्यंत जातील आणि व्यावसायिक आदानप्रदान परंपरा कायम ठेवतील. भारताची सागर (क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास)संकल्पना आणि हिंद-प्रशांत महासागरी उपक्रम (आयपीओआय) यांना अनुसरून भारत आणि जपान यांच्यादरम्यान 2006 मध्ये झालेल्या सहकार्य करारानुसार ही भेट आखण्यात आली आहे.

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2142983)