पंतप्रधान कार्यालय
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2025 7:56AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन अर्पण केले.
डॉ. मुखर्जी यांच्या अमूल्य योगदानाची आठवण करून देताना मोदी म्हणाले की, देशाच्या “आन, बान आणि शान” यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे आदर्श व सिद्धांत अतिशय मौल्यवान आहेत, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी 'एक्स'वर पोस्ट केले –
"राष्ट्राचे अमर सुपुत्र डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. देशाच्या आन, बान आणि शान यांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे आदर्श व सिद्धांत अतिशय मौल्यवान आहेत."
***
S.Pophale/N.Gaikwad/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142655)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam