ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये  ग्राहकांना 7.14  कोटी रुपये परत मिळवून दिले

प्रविष्टि तिथि: 04 JUL 2025 1:40PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये  ग्राहकांना 7.14 कोटी रुपये परत मिळवून  देण्यात यश मिळवले आहे. प्रामुख्याने 30 क्षेत्रांमध्ये ही भरपाई करण्यात आली असूनग्राहकांच्या परतावा  दाव्यांशी संबंधित 15,426 तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यात आले. 

विशेष म्हणजे ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक 8,919 तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, त्याअनुषंगाने सर्वाधिक 3.69 कोटी रुपयांचा परतावा मिळवून देण्यात आला. त्याखालोखाल ट्रॅव्हल अँड टुरिझम (प्रवास आणि पर्यटन) क्षेत्राला 81 लाख रुपयांचा परतावा मिळाला.

ई-कॉमर्स परताव्याशी संबंधित तक्रारी देशभरातून आल्या, ज्यामध्ये सर्वाधिक (1242) उत्तर प्रदेशमधील होत्या, तर सिक्कीम आणि दादरा आणि नगर हवेली सारख्या लहान प्रदेशांमधून देखील तक्रारी नोंदवल्या गेल्या. यामधून राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन हे खऱ्या अर्थाने देशव्यापी ग्राहक तक्रार निवारण व्यासपीठ असल्याचे स्पष्ट होते. 

क्षेत्र-निहाय प्राप्त तक्रारींची संख्या आणि संबंधित परताव्याची रक्कम पुढील प्रमाणे:

 

S.No.

Sector

Total Grievances

Total Amount Refunded (in ₹)

1

E- Commerce

8919

36,958,548

2

Travel & Tourism

1057

8,141,119

3

General Insurance

101

4,143,045

4

Agency Services

261

3,841,754

5

Airlines

186

3,086,848

6

Others

4902

1,53,18,942

 

Total

10,373

7,14,90,256

25 एप्रिल ते 30 जून 2025 दरम्यान 7.14 कोटी रुपयांचा परत मिळवून  देण्यात मिळालेले यश या हेल्पलाइनची कार्यक्षमता आणि प्रतिसाद देण्याची क्षमता दर्शवत असून, परिवर्तन भागीदारांचा विस्तार आणि भागधारकांचा भक्कम सहभाग, यामुळे हे शक्य झाले. यामधून वेळेवर, कोणत्याही त्रासाशिवाय तक्रार निवारण करण्यामधील या हेल्पलाइनची महत्त्वाची भूमिका, तसेच ग्राहक कल्याण आणि बाजारपेठेतील पारदर्शकता वाढवणारे एक विश्वासार्ह, खटलापूर्व व्यासपीठ म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित होते.

ग्राहकांना 1915 या टोल फ्री क्रमांकावर 17 भाषांमध्ये आपल्या तक्रारी नोंदवता येतील. एकात्मिक तक्रार निवारण यंत्रणा (इनग्राम) असलेल्या ओमनी-चॅनेल, या आयटी-सक्षम केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातूनही तक्रारी नोंदवता येतील. यासाठी ग्राहकांना लवचिकता आणि सुविधा देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये व्हॉट्सअॅप (8800001915), एसएमएस (8800001915), ईमेल (nch-ca[at]gov[dot]in), एनसीएच अॅप, वेब पोर्टल (consumerhelpline.gov.in) आणि उमंग अॅप यांचा समावेश आहे.

विभागाने ग्राहक संरक्षण चौकट मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला असून सर्व ग्राहकांनी आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि तक्रारींचे वेळेवर निराकरण करून घेण्यासाठी हेल्पलाइनचा सक्रियपणे वापर करावा, असे आवाहन केले आहे.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2142174) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu