रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेलवन ॲपचे उद्घाटन : सर्व प्रवासी सेवांसाठी एक-थांबा उपाय

Posted On: 01 JUL 2025 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2025

 

प्रवाशांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने रेल्वे सतत पावले उचलत असते. नवीन पिढीच्या गाड्या सुरू करणे, स्थानकांचा पुनर्विकास करणे, जुन्या डब्यांचे नवीन एलएचबी डब्यांमध्ये श्रेणीवर्धन करणे अशा अनेक पावलांमुळे गेल्या दशकात प्रवाशांचा अनुभव सुधारला आहे.

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे RailOne या नवीन ॲपचा प्रारंभ केला. रेलवन हे ॲप रेल्वे आणि प्रवासी यांच्यातील संवाद सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते.

हे एक व्यापक, सर्वसमावेशक ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस आहे. हे ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. यात सर्व प्रवासी सेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत, उदाहरणार्थ :

  • 3% सवलतीसह अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटे
  • लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग
  • तक्रार निवारण
  • ई-कॅटरिंग, पोर्टर बुकिंग आणि शेवटच्या मैलापर्यंतची टॅक्सी

आयआरसीटीसीवर आरक्षित तिकिटांची उपलब्धता कायम राहील. आयआरसीटीसीसोबत भागीदारी केलेल्या इतर अनेक व्यावसायिक अ‍ॅप्सप्रमाणेच रेलवन अ‍ॅपलाही आयआरसीटीसीने अधिकृत केले आहे.

RailOne मध्ये mPIN किंवा बायोमेट्रिकद्वारे लॉगिनसह सिंगल-साइन-ऑनची सुविधा आहे. हे विद्यमान RailConnect आणि UTS संदर्भांनादेखील संलग्न करता येते. हे ॲप जागा वाचवणारे आहे, कारण इतर अनेक ॲप्स स्थापित करण्याची आवश्यकता उरत नाही.

डिसेंबर 2025 पर्यंत आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस)

रेल्वेमंत्र्यांनी सीआरआयएसच्या संपूर्ण चमूचे स्थापना दिनानिमित्त अभिनंदन केले. त्यांनी सीआरआयएसला भारतीय रेल्वेच्या डिजिटल गाभ्याला अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

विद्यमान आरक्षण प्रणालीचे श्रेणीवर्धन करण्याच्या प्रगतीबद्दल मंत्र्यांनी सीआरआयएस चमूचे कौतुक केले. आधुनिक आरक्षण प्रणाली वेगवान , बहुभाषिक आणि सध्याच्या भारापेक्षा 10 पट जास्त भार हाताळण्याच्या दृष्टीने प्रमाणशीर असेल. ती प्रति मिनिट 1.5 लाख तिकीट बुकिंग आणि 40 लाख चौकशींचा सामना करण्यास सक्षम असेल.

नवीन आरक्षण प्रणाली सर्वसमावेशक असेल. त्यात आसन निवड आणि भाडे तक्त्यासाठी प्रगत कार्यक्षमता तसेच दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्ण इत्यादींसाठी एकात्मिक पर्याय असतील.

भविष्य निश्चित करणारे तंत्रज्ञान

भारतीय रेल्वेची प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताच्या  विकास यात्रेचे विकास इंजिन बनण्याच्या दृष्टिकोनातून होतं आहे. रेलवन ॲपच्या प्रारंभामुळे तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आणि प्रत्येक प्रवाशाला जागतिक दर्जाची गतिशीलता प्रदान करण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेची पुष्टी होते.

 

* * *

S.Kane/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2141307) Visitor Counter : 8