दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
नैसर्गिक आणि मानव-निर्मित आपत्तींच्या काळात धोक्याच्या सूचनेचे त्वरित प्रसार सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या स्वदेशी कक्ष प्रसारण प्रणालीची देशव्यापी चाचणी
Posted On:
30 JUN 2025 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2025
नागरिकांना योग्य वेळी माहिती पुरवण्यासाठी केंद्रीय संपर्क मंत्रालयाच्या अखत्यारीतील दूरसंचार विभाग (डीओटी) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एनडीएमए) सहयोगाने देशभरात मोबाईल-सक्षम आपत्तीविषयक संपर्क प्रणालीत सक्रियतेने सुधारणा घडवून आणत आहे.
आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघाने (आयटीयु) शिफारस केलेल्या सामायिक इशारा नियमावली (सीएपी) वर आधारित असलेल्या टेलीमॅटीक्सचे विकसन केंद्रातर्फे (सी-डीओटी) विकसित केलेली एकात्मिक इशारा यंत्रणा एनडीएमएने यशस्वीपणे परिचालित केली आहे. देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये (युटीज) ही यंत्रणा यापूर्वीच कार्यरत झाली असून विशेषतः भू-लक्ष्यित भागातील प्रभावित नागरिकांच्या मोबाईल फोनवर एसएमएसच्या माध्यमातून विविध आपत्ती आणि आपत्कालीन काळाबाबत संदेश पाठवण्यात येत आहेत. विविध नैसर्गिक आपत्ती, हवामानविषयक इशारे आणि चक्रीवादळाच्या घटनांच्या काळात 19 हून अधिक भारतीय भाषांमध्ये 6,899 कोटींहून अधिक एसएमएस पाठवण्यासाठी विविध आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे.
त्सुनामी, भूकंप, वीज पडण्याच्या घटना तसेच गॅस गळती किंवा रसायनांच्या धोक्यांसारख्या मानव-निर्मित आणीबाणीच्या प्रसंगांसारख्या काळाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आपत्तीजनक स्थितीमध्ये धोक्याच्या सूचनांचा प्रसार आणखी बळकट करण्यासाठी, एसएमएसच्या बरोबरच कक्ष प्रसारण (सीबी) तंत्रज्ञान देखील लागू करण्यात येत आहे. कक्ष प्रसारण तंत्रज्ञानाद्वारे प्रभावित भागातील नागरिकांना प्रसारण पद्धतीने मोबाईल फोनवर धोक्याचे इशारे पाठवण्यात येतात आणि म्हणून अशा इशाऱ्यांचे प्रसारण बहुतेकदा वास्तविक वेळेत होते. टेलीमॅटीक्सचे विकसन केंद्र (सी-डीओटी) हे दूरसंचार विभागाचे प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र असून कक्ष प्रसारण-आधारित सार्वजनिक आपत्ती इशारा यंत्रणेचे स्वदेशी विकसन तसेच अंमलबजावणीसाठी हे अत्यंत विश्वसनीय केंद्र आहे.
संपूर्ण भारतभरात ही प्रणाली सुरु करण्याच्या कार्याचा एक भाग म्हणून, या प्रणालीची सुरुवात करण्याआधी त्या प्रणालीची परिणामकारकता आणि सुयोग्य कार्याची खात्री करून घेण्यासाठी सीबी प्रणालीची चाचणी घेण्यात येत आहे. संपूर्ण देशात 2 ते 4 आठवड्यात ही चाचणी घेण्यात येईल. या कालावधीत नागरिकांना त्यांच्या मोबाईल फोनवर इंग्रजी आणि हिंदी भाषेतील संदेश मिळतील. हे “चाचणी संदेश” केवळ ज्या मोबाईल फोनमध्ये सीबी चाचणी वाहिन्या सक्षम करण्यात आल्या आहेत अशाच मोबाईल फोनवर पाठवले जातील. मोबाईल टॉवर्सच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये (बेस स्टेशन ट्रान्स रिसिव्हर-बीटीएस) सदर प्रणालीच्या सुयोग्य कार्याची तपासणी करण्यासाठी चाचणी वाहिनीद्वारे चाचणी टप्प्यामध्ये हे संदेश अनेक वेळा पाठवण्यात येऊ शकतात. हे चाचणी संदेश म्हणजे सुनियोजित देशव्यापी चाचणी अभियानाचा भाग असून त्यावर मोबाईल धारकांकडून कोणतीही कृती अपेक्षित नाही.
The content of the test message will be as follows:
English:
This is a TEST Cell Broadcast message sent by the National Disaster Management
Authority in coordination with the Department of Telecommunications (DoT), Government of India, as part of testing the Cell Broadcast solution for disseminating alerts. During the testing of the Cell Broadcast solution, you may receive this message multiple times on your mobile handset. Please ignore these message(s); no action is required at your end.
Hindi:
यह एक टेस्ट सेल ब्रॉडकास्ट संदेश है, जिसे राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण (NDMA) ने दूरसंचार विभाग (DoT), भारत सरकार के साथ मिलकर सेल ब्रॉडकास्ट समाधान के परीक्षण के तहत भेजा है। परीक्षण के दौरान आपको यह संदेश अपने मोबाइल पर कई बार प्राप्त हो सकता है। कृपया इन संदेशों को अनदेखा करें, आपकी ओर से कोई कार्रवाई करने की आवश्यकता नहीं है।
एकदा यशस्वी चाचणी होऊन ही प्रणाली कार्यरत झाल्यानंतर, -कोणत्याही चाचणी वाहिनी सेटिंग्ज असल्या तरी- सर्व मोबाईल फोन्सवर विविध भारतीय भाषांमध्ये धोक्याचे इशारे पाठवण्यासाठी सीबी यंत्रणा वापरण्यात येणार असून त्यायोगे प्रत्यक्ष आपत्तीकाळात विस्तारित आणि समावेशक सार्वजनिक पोहोच सुनिश्चित होईल.
डीओटीने या महत्त्वाच्या चाचणी टप्प्यात जनतेकडून सहकार्याची अपेक्षा केली असून या काळात पाठवण्यात येणारे सर्व संदेश केवळ यंत्रणा प्रमाणीकरणाच्या उद्देशाने वापरण्यात येत आहेत आणि जनतेकडून त्यावर कोणतीही कृती आवश्यक नाही याचा विभागाने पुनरुच्चार केला आहे.
Follow DoT Handles for more:-
X - https://x.com/DoT_India
Insta https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==
Fb - https://www.facebook.com/DoTIndia
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140994)