अर्थ मंत्रालय
एकीकृत निवृत्तीवेतन योजना (युपीएस) अंतर्गत पर्याय निवडण्याची मुदत तीन महिन्यांनी म्हणजेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली
Posted On:
23 JUN 2025 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2025
केंद्र सरकारच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्तीवेतन योजना (युनिफाइड पेन्शन स्कीम (युपीएस) भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025 रोजी अधिसूचना क्रमांक F. क्रमांक FX-1/3/2024-PR द्वारे अधिसूचित केली होती.
ही व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी, निवृत्ती वेतन नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) ने 19 मार्च 2025 रोजी पीएफआरडीए (एनपीएस अंतर्गत युपीएसचे क्रियान्वयन) विनियम 2025 अधिसूचित केला.
नियमांनुसार, पात्र विद्यमान कर्मचारी, माजी निवृत्त आणि मृत माजी निवृत्त व्यक्तींच्या कायदेशीररित्या विवाहित जोडीदारांना योजनेअंतर्गत त्यांचा पर्याय निवडण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी म्हणजेच 30 जून 2025 पर्यंत मुदत दिली होती.
अंतिम तारीख वाढवण्याची विनंती करण्याबाबत विविध हितधारकांकडून प्राप्त निवेदनांच्या आधारे, केंद्र सरकारने पात्र विद्यमान कर्मचारी, माजी निवृत्त आणि मृत माजी निवृत्त व्यक्तींच्या कायदेशीररित्या विवाहित जोडीदारांसाठी यूपीएससाठी पर्याय निवडण्याची अंतिम तारीख तीन महिन्यांनी म्हणजेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139083)