उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षणाच्या व्यापारीकरणाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली चिंता

Posted On: 17 JUN 2025 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2025

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले की, "...सनातन संस्कृतीचा अभिमान पुन्हा निर्माण होत आहे. जे गमावले होते ते अधिक दृढनिश्चयाने पुन्हा निर्माण होत आहे." 

आज पाँडिचेरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना संबोधित करताना धनखड म्हणाले, “भारताचा शैक्षणिक भूगोल आणि इतिहास तक्षशिला, नालंदा, मिथिला, वल्लभी आणि इतर अनेक महान विद्यापीठांनी रेखांकित केलेला आहे. 

शिक्षणाच्या व्यापारीकरणाबद्दल चिंता व्यक्त करताना धनखड म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा शिक्षण आणि आरोग्य ही पुरेशी संसाधने असलेल्या लोकांची समाजाला परतफेड करण्यासाठीची साधने होती. त्यांनी कधीही यांना नफा कमावणारे उपक्रम असल्याचे मानले नाही. आरोग्य आणि शिक्षणातील त्यांचे उपक्रम आपल्या प्राचीन ज्ञानाने प्रेरित  होते - आपण नागरिकांच्या या सुयोग्य उदाहरणांचे अनुकरण करून समाजाला त्यांचे देणं परत केले पाहिजे आणि म्हणूनच प्रयत्न असा असावा की, आपण शिक्षणाच्या व्यापारीकरणाने प्रेरित होऊ नये.

आपले शिक्षण हे भारतीय संविधानातील 22 लघुचित्रांपैकी एकामध्ये स्थान असलेल्या भारताच्या पारंपरिक गुरुकुल प्रणालीशी सुसंगत असले पाहिजे आणि त्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. ज्ञान मिळवण्याबरोबरच आपण मुलामुलींना चरित्र्य विकासाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे कारण तेव्हाच ज्ञान संपादनाला दर्जेदार अत्याधुनिकता मिळेल. सेवारूपी शिक्षण हे सध्याच्या वेगाने उदयास येणाऱ्या व्यावसायिक प्रारूपामध्ये विषमस्थानी असल्याचे दिसून येते आणि म्हणूनच मानसिकता बदलण्याचे आवाहन मी  कॉर्पोरेट्सना करीत आहे. भारत परोपकाराचे जनकस्थान आहे. मी कॉर्पोरेट नेत्यांना आवाहन करतो की कंपनीच्या ताळेबंदाच्या संकल्पनेपासून खूप दूर जाऊन, जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांना हरित क्षेत्र प्रकल्पासाठी एकत्रितपणे सज्ज करून तुमची सीएसआर संसाधने एकत्रित करा.“

भारतातील भाषा सर्वसमावेशकता दर्शवतात, हे अधोरेखित करून धनखड यांनी पृच्छा केली की, भाषांमध्ये आपण विभागलेच कसे जाऊ शकतो? जगातील कोणताही देश आपल्या भारताइतका भाषांच्या बाबतीत समृद्ध नाही आणि कल्पना करा, संस्कृत जागतिक स्तरावर महत्त्वाचे आहे - तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, मराठी, पाली, प्राकृत, बंगाली, आसामी - मी या 11 भाषांची नावे उद्धृत करतो कारण त्या आपल्या अभिजात भाषा असल्याचे ते म्हणाले.

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/N.Mathure/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2137012)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil