श्रम आणि रोजगार मंत्रालय
सार्वजनिक आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणात उत्कृष्टतेचे मॉडेल म्हणून उदयास येत असलेले ईएसआयसी सनथ नगर कॅम्पस
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2025 3:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2025
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हैदराबादमधील सनथ नगर येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. सुमारे 21 एकर जागेवर वसलेल्या या कॅम्पसचा विस्तार आणखी 11 एकर जागेवर होणार असून कामगार वर्ग आणि त्यांच्या कुटुंबियांना परवडणाऱ्या, सुलभ आणि उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.

या कॅम्पस मधील दोन रुग्णालयांना 2019 पासून 500 पेक्षा जास्त खाटांच्या श्रेणीत सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी ईएसआयसी रुग्णालये म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
समर्थ नगरने माहिती तंत्रज्ञानावर आधारित रुग्णसेवेचा पाया घातला असून यामध्ये औषधांचे घरपोच वितरण, घरी येऊन रक्त आणि इतर नमुन्यांचे संकलन, AAA+ अॅपद्वारे ऑनलाइन सल्लामसलत आणि 5G-सक्षम रुग्णवाहिका यांचा समावेश असून सार्वजनिक आरोग्य आणि संपर्कसेवा यात नवीन मापदंड स्थापित केला आहे. ही संस्था डिजिटल लायब्ररी, आधुनिक प्रयोगशाळा, कौशल्य प्रयोगशाळा, सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षण आणि प्रख्यात प्राध्यापकांच्या व्याख्यानांसह एक समृद्ध शैक्षणिक परिसंस्था प्रदान करते.

या संस्थेने कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या शिक्षण आणि अध्यापन; उद्योग आणि समाज सहभाग; संशोधन आणि ज्ञान हस्तांतरण आणि सुशासनासह नेतृत्व, या चार स्तंभांवर आधारित कार्यप्रणाली अवलंबली आहे.

उत्कृष्ट कामगिरी करणारी ही संस्था सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील एक प्रेरणा तर आहेच शिवाय भविष्यातील वैद्यकीय क्षेत्रातील धुरिणांसाठी एक कार्यशाळा आहे. या कॅम्पसचा सातत्याने होणार विकास, तंत्रज्ञान, कौशल्य निर्माण आणि रुग्णसेवा यांवर असलेला भर या सर्वांमुळे ईएसआयसी सनथ नगर हे सार्वजनिक आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणातील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित होण्यास सज्ज आहे.

S.Kakade/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2135908)
आगंतुक पटल : 21