लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी के. एस. हेगडे यांच्या जयंतीनिमित्त वाहिली पुष्पांजली

Posted On: 11 JUN 2025 5:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2025

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकसभेचे माजी अध्यक्ष के. एस हेगडे यांच्या जयंतीनिमित्त संविधान सदनातील त्यांच्या छायाचित्राला पुष्पांजली वाहिली.

राज्यसभेचे उपसभापती  हरिवंश; संसद सदस्य, माजी संसद सदस्य, लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह, राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी तसेच लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हेगडे यांना आदरांजली वाहिली.

के. एस. हेगडे हे एक प्रख्यात संसदपटू आणि नाणावलेले   कायदेतज्ञ होते. 1952 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले आणि 1957 पर्यंत ते सभागृहाचे सदस्य होते, त्यानंतर तत्कालीन म्हैसूर उच्च न्यायालयाचे  न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. नंतर, त्यांनी दिल्ली आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. 1967 मध्ये, त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, या पदावर ते 30 एप्रिल 1973 रोजी राजीनामा देईपर्यंत कार्यरत राहिले. 1977 मध्ये ते बंगळुरू दक्षिण मतदारसंघातून सहाव्या लोकसभेवर निवडून आले. 21 जुलै 1977 रोजी डॉ. नीलम संजीव रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर हेगडे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. जानेवारी 1980 मध्ये लोकसभा अध्यक्ष पद त्यागल्यानंतर ते कर्नाटकातील त्यांच्या मूळ गावी स्थायिक झाले. हेगडे यांचे 24 मे 1990 रोजी निधन झाले.

लोकसभा सचिवालयाने एस. हेगडे यांचा जीवन प्रवास असलेली हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित केलेली पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2135727)