भारतीय निवडणूक आयोग
स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे बीजभाषण
भारताच्या निवडणूकीतील पारदर्शकता, व्याप्ती आणि विविधता यावर टाकला प्रकाश
Posted On:
11 JUN 2025 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2025
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीडनमध्ये काल संध्याकाळी झालेल्या स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय निवडणूक सचोटी परिषदेत बीजभाषण करताना भारताची निवडणूक पारदर्शकता, विश्वासार्हता, व्याप्ती आणि विविधता अधोरेखित केली. त्यांनी जगभरातील देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांसाठी क्षमता निर्माण कार्यक्रमांमध्ये भारतीय निवडणूक आयोगच्या भूमिकेविषयी सांगितले. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सद्वारे आयोजित या परिषदेत सुमारे 50 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे 100 हून अधिक जण सहभागी झाले आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांच्या व्याप्तीची माहिती, ज्ञानेश कुमार यांनी उपस्थितांना दिली. विशेषतः संसदीय निवडणुकांबाबत त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या टप्प्यांवर राजकीय पक्ष, उमेदवार, पोलीस, खर्च निरीक्षक, प्रसारमाध्यमे कशा प्रकारे बारकाईने लक्ष पुरवतात, याविषयी त्यांनी सांगितले. भारतातील निवडणूक आयोजनात समन्वयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. निवडणुकीच्या वेळी मतदान कर्मचारी, पोलिस दल, निरीक्षक आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी अशा 20 दशलक्षाहून अधिक कर्मींसह, निवडणूक आयोग जगातील सर्वात मोठी संघटना बनते, जी अनेक राष्ट्रीय सरकारे आणि प्रमुख जागतिक कंपन्यांच्या एकत्रित कार्यबलाला मागे टाकते आणि भारतातील जवळजवळ एक अब्ज मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार मुक्तपणे वापरता येण्याची सुनिश्चिती करते.
गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या भारतीय निवडणुकीच्या उत्क्रांतीचा आढावा ज्ञानेश कुमार यांनी मांडला. आपली संवैधानिक मूल्ये घट्ट करत वाढत्या गुंतागुंतींशी व्यवस्थेने कसे जुळवून घेतले आहे, हे त्यांनी नमूद केले.
1960 पासून आजपर्यंत निवडणुकीपूर्वी आणि पुनर्विलोकन दरम्यान दरवर्षी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत भारताच्या मतदार यादीचे सामायिकीकरण त्यांनी अधोरेखित केले, ज्यामध्ये दावे, हरकती आणि अपीलांची तरतूद आहे. जगातली सर्वात काटेकोर आणि पारदर्शक अशी ही प्रक्रिया असून यातून निवडणूक प्रक्रियेची अचूकता आणि सचोटी वृद्धिंगत होते. ही मजबूत यंत्रणा वर्षानुवर्षे देशभरात निवडणूक विश्वासार्हता टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
परिषदेदरम्यान ज्ञानेश कुमार यांनी मेक्सिको, इंडोनेशिया, मंगोलिया, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, मोनितर मॉल्दोव्हा, लिथुआनिया, मॉरिशस, जर्मनी, क्रोएशिया, युक्रेन आणि ब्रिटनमधील त्यांच्या समकक्षांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. या चर्चा मतदार सहभाग, निवडणूक तंत्रज्ञान आणि संस्थात्मक क्षमता-उभारणी यावर केंद्रित होत्या.
* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135701)