वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारत-स्वित्झर्लंड आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी स्विस उद्योगांशी साधला संवाद
निर्मिती, कौशल्य आणि नवोन्मेष यासाठी भारताकडे एक धोरणात्मक केंद्र म्हणून पाहण्याचे स्विस कंपन्यांना गोयल यांचे आवाहन
जैवतंत्रज्ञान, आरोग्य, संरक्षण, अचूक अभियांत्रिकी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील स्विस उद्योग गोलमेज परिषदांचे गोयल यांनी भूषवले अध्यक्षपद
Posted On:
10 JUN 2025 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 9 जून 2025 रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे स्विस उद्योग नेत्यांशी व्यापक चर्चा केली, भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना (EFTA) यांच्यात अलीकडेच स्वाक्षरी झालेल्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (TEPA) अंतर्गत आर्थिक सहकार्य अधिक दृढ करणे तसेच नव्या संधीचा शोध घेणे आहे, हा चर्चेचा उद्देश होता. भारतीय आणि स्विस उद्योगांमधील समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून, नवोन्मेष, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि शाश्वत उत्पादन यावर विशेष भर देऊन, विविध क्षेत्रातील अनेक प्रमुख स्विस कंपन्यांच्या प्रमुखांची गोयल यांनी भेट घेतली. स्विस कंपन्यांचा भारतातील प्रभाव वाढवण्यासाठी आणि देशाच्या गतिमान आणि वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी गोयल यांनी त्यांना आमंत्रित केले. भारताच्या पारदर्शक नियामक प्रक्रिया, मजबूत बौद्धिक संपदा प्रणाली आणि गुंतवणूक अनुकूल धोरणात्मक चौकटीद्वारे व्यवसायस्नेही वातावरण निर्माण करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा गोयल यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी स्विस उद्योगांना भारताकडे केवळ एक बाजारपेठ म्हणून नव्हे, तर निर्मिती, कौशल्य आणि नवोन्मेषासाठी एक धोरणात्मक केंद्र म्हणून पाहण्याचे आवाहन केले.
या धोरणात्मक चर्चेनंतर, गोयल यांनी स्विस उद्योग क्षेत्रातील नेत्यांसोबत बायोटेक आणि फार्मा, आरोग्यसेवा आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग, संरक्षण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांवर केंद्रित असलेल्या दोन गोलमेज परिषदांचे अध्यक्षपद भूषवले. स्वित्झर्लंडमधील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या सत्रांमध्ये भारतामधील विस्तार, खरेदीक्षमता आणि वाढत्या नवोन्मेष वातावरणावर प्रकाश टाकला.
स्विस व्यवसायांना Invest India च्या समर्पित EFTA डेस्कचा लाभ घेण्याचे गोयल यांनी आवाहन केले. स्विस आणि भारतीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक सेतू बांधण्याच्या भारताच्या सक्रीय भूमिकेवर प्रकाश टाकत, नियामक सुसंवाद आणि परस्पर मान्य करारांसाठी काम करण्याची भारताच्या तयारीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
उद्योग संवादांव्यतिरिक्त, मंत्री गोयल यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या स्वित्झर्लंड चॅप्टरच्या सदस्यांशीही भेट घेतली. त्यांनी भारत-स्वित्झर्लंड व्यावसायिक आणि व्यवसाय परिसंस्था मजबूत करतांना ICAI च्या उच्च मानके आणि जागतिक प्रतिष्ठा राखल्याबद्दल तसेच त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. जैवतंत्रज्ञान, अचूक उत्पादन, आरोग्यसेवा, ऑटोमेशन, संरक्षण, सायबरसुरक्षा आणि प्रगत साहित्य यासह विविध क्षेत्रातील स्विस उद्योग नेत्यांनी जागतिक आर्थिक शक्ती आणि नवोन्मेष विकास वाढीच्या गतीबद्दल तसेच भारताने स्वीकारलेल्या मार्गावर दृढ विश्वास व्यक्त केला.
कंपन्यांनी भारताच्या अद्वितीय सामर्थ्याचे कौतुक केले, एक विशाल आणि गतिमान बाजारपेठ, वाढता मध्यमवर्ग, जागतिक दर्जाची अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक प्रतिभा आणि व्यवसाय सुलभतेला सक्रियपणे प्रोत्साहन देणारे धोरणात्मक वातावरण, बौद्धिक संपदा संरक्षण तसेच तंत्रज्ञान भागीदारींवर यावेळी भर दिला, भारत केवळ एक आशादायक बाजारपेठ नाही तर निर्मित, संशोधन आणि विकास आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उपायांसह-निर्मितीसाठी अनेकांसाठी एक आदर्श केंद्र आहे.
अनेक कंपन्यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना सेवा देण्यासाठी संयुक्त उपक्रम सुरू करण्याची, कार्य विस्तारण्याची व उत्पादन स्थानिकीकरण करण्याची इच्छाही व्यक्त केली. अत्याधुनिक कर्करोग उपचार आणि पेशी विज्ञानांपासून ते औद्योगिक ऑटोमेशन, फायबर ऑप्टिक्स, अंतराळ तंत्रज्ञान आणि डिजिटल सुरक्षा पर्यंत, स्विस कंपन्यांनी भारताचे विकासाचे प्राधान्यक्रम आणि प्रादेशिक विकास योजनांसोबत त्यांची संलग्नता अधोरेखित केली. धोरणात्मक संलग्नता आणि दीर्घकालीन वचनबद्धतेची भावना या बैठकांमध्ये निर्माण झाली होती. अनेक सहभागींनी भारताचे एक नैसर्गिक भागीदार म्हणून वर्णन केले तसेच विकासाच्या आगामी टप्प्यात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली, केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठीच नाही तर जागतिक मूल्य साखळीत भारताला एक केंद्र म्हणून स्थान निर्माण करता येणार आहे.
* * *
S.Patil/R.DalekarD.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135364)