गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय भाषा अनुभागचे  केले उद्घाटन

Posted On: 06 JUN 2025 5:24PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय भाषा अनुभागचे उद्घाटन केले. केंद्रीय गृह सचिव आणि राजभाषा विभागाचे सचिव, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषा अनुभागची स्थापना झाल्यामुळे राजभाषा विभागाला परिपूर्णता प्राप्त झाली आहे. प्रशासनाला परदेशी भाषांच्या प्रभावापासून मुक्त करण्याच्या दिशेने हा महत्वाचा टप्पा ठरेल, असे ते म्हणाले. आपल्या विचारांची, विश्लेषणाची आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया मातृभाषेत असेल, तरच आपल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले. गृहमंत्री अमीत शाह म्हणाले की, देशातील सर्व स्थानिक भाषांना बळकटी देऊनच आपण भारताला त्याच्या शाश्वत गौरवशाली स्थानावर घेऊन जाऊ शकतो. आपली प्रत्येक भाषा इतर भाषांशी पूर्णपणे जोडलेली आहे, आणि एकमेकांच्या विकासाशिवाय, सर्व भाषांचा विकास होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. आपल्या सर्व भाषासदृश नद्या एकत्र येऊन भारतीय संस्कृतीची गंगा बनतात असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारतीय भाषा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहेत आणि आपली संस्कृती भारताचा आत्मा आहे. अमित शाह म्हणाले की, हा विभाग भारतातील भाषिक विविधतेला समाहित  करून सर्व भाषांना एक मजबूत आणि संघटित व्यासपीठ प्रदान करेल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, सर्व भाषांची भावना, समृद्धी आणि संवेदनशीलता कमी न करता तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. इंग्रजीच्या सक्ती विरोधातील लढा आपण नक्कीच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2134622)