अल्पसंख्यांक मंत्रालय
वक्फ मालमत्तांचे वास्तविक वेळेत अपलोडिंग, पडताळणी तसेच देखरेख यांसाठीच्या उम्मीद मध्यवर्ती पोर्टलचा केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
Posted On:
06 JUN 2025 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 06 जून 2025
“उम्मीद पोर्टल भारतातील वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन तसेच प्रशासन यांच्या इतिहासात नवा अध्याय जोडेल. हे पोर्टल केवळ पारदर्शकता आणणार नसून सर्वसामान्य मुसलमान व्यक्ती, विशेषतः महिला आणि मुलांना देखील सहाय्य करेल,” असे केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार तसेच संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू म्हणाले. नवी दिल्ली येथे आज उम्मीद मध्यवर्ती पोर्टलचे उद्घाटन केल्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधत होते.
केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाने विकसित केलेल्या या पोर्टलचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांच्या उपस्थितीत पार पडले.

या घडामोडीला ऐतिहासिक पाऊल असे संबोधत केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी सांगितले की उम्मीद मध्यवर्ती पोर्टल म्हणजे केवळ तंत्रज्ञानविषयक अद्ययावतीकरण नसून त्याहून अधिक सुविधा देणारा उपक्रम आहे. “अल्पसंख्यक समुदायांच्या हक्कांचे रक्षण करणे तसेच समुदायाच्या मालकीच्या वक्फ मालमत्तांचा वापर ज्यांच्यासाठी करणे अपेक्षित आहे अशा गरीब मुसलमान व्यक्तींसाठी केला जाईल हे सुनिश्चित करणे याप्रती असलेल्या सरकारच्या दृढ कटिबद्धतेचे प्रतीक आहे,”ते पुढे म्हणाले.
एकात्मिक वक्फ व्यवस्थापन, सशक्तीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा, 1995 चे लघुरूप उम्मीद मध्यवर्ती पोर्टल, वक्फ मालमत्तांचे वास्तव वेळेत अपलोडिंग, पडताळणी तसेच देखरेख यांसाठी केंद्रीकृत डिजिटल मंच म्हणून कार्य करेल. अधिक पारदर्शकता, विश्वासार्हता तसेच लोक सहभाग यांच्या माध्यमातून हे पोर्टल देशभरातील वक्फ मालमत्तांच्या प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणेल अशी अपेक्षा आहे.
या पोर्टलची ठळक वैशिष्ट्ये:
• वक्फ बोर्डाच्या सर्व मालमत्तांच्या जिओ-टॅगिंगसह डिजिटल यादीची निर्मिती
• अधिक उत्तम प्रतिसादासाठी ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा
• पारदर्शक भाडेकरार प्रक्रिया आणि वापराचा मागोवा
• जीआयएस मॅपिंग आणि इतर ई-सरकारी साधनांसोबत एकत्रीकरण
• सत्यापित नोंदी आणि अहवाल सामान्य जनतेसाठी उपलब्ध
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134619)