पंतप्रधान कार्यालय
अयोध्येमध्ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना झाल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2025 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2025
अयोध्येमध्ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठा होणे, ही बाब सर्व रामभक्तांना श्रद्धा आणि आनंदाने भारून टाकणारी आहे.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम सर्व देशवासीयांना आनंद, समृद्धी आणि आरोग्य प्रदान करतील अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी एका ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे;
"प्रभु श्रीरामांचे जन्मस्थान असलेली अयोध्यानगरी आणखी एका गौरवशाली आणि ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनली आहे. भव्य-दिव्य राम दरबाराच्या प्राण-प्रतिष्ठापनेचा पावन प्रसंग समस्त रामभक्तांना श्रध्दा आणि आनंदाने भावविभोर करणारा आहे. मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीराम सर्व देशवासियांना सुख-समृध्दी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतील, अशी मी कामना करतो.जय सीताराम !"
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2134346)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam