पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गेल्या 11 वर्षात, आमच्या सरकारचे प्रत्येक पाऊल गरिबांची सेवा, सुशासन आणि कल्याणासाठी समर्पित आहेः पंतप्रधान


आमच्या सरकारने सर्वंकष विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे परिवर्तनकारी परिणाम प्राप्त झाले आहेत आणि गरीब आणि वंचितांना लाभ झाला आहेः पंतप्रधान

Posted On: 05 JUN 2025 9:45AM by PIB Mumbai

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारची गरीब कल्याणासाठी असलेली अतूट बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशात परिवर्तनकारी आणि सर्वसमावेशक शासनाची 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ते म्हणाले की, सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि समावेशकतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका कनवाळू सरकारने 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पंतप्रधानांनी पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, जन धन योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या परिवर्तनकारी योजनांच्या परिणामांना अधोरेखित केले ज्या योजनांमुळे गृहनिर्माण, स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन, बँकिंग आणि आरोग्यसेवेची उपलब्धता वाढली आहे. त्यांनी लाभांचे पारदर्शक आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करणाऱ्या थेट लाभ हस्तांतरण (DBT), डिजिटल समावेशकता आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचे महत्त्व देखील अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले 

"गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित, एक कनवाळू सरकार! 
गेल्या दशकात, एनडीए सरकारने सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशकतेवर लक्ष केंद्रित करून, अनेक लोकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी परिवर्तनकारक पावले उचलली आहेत. आमच्या सर्व प्रमुख योजनांनी गरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, जन धन योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या उपक्रमांनी गृहनिर्माण, स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन, बँकिंग आणि आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवली आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT), डिजिटल समावेशकता आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवर भर दिल्याने शेवटच्या घटकापर्यंत लाभांचे पारदर्शक आणि जलद वितरण सुनिश्चित झाले आहे.

यामुळेच 25 कोटींहून जास्त लोकांनी गरिबीवर मात केली आहे. जिथे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळेल अशा समावेशक आणि स्वयंपूर्ण भारताची निर्मिती करण्यासाठी एनडीए वचनबद्ध आहे.

#11YearsOfGaribKalyan"

"आमच्या सरकारच्या सर्वंकष विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे परिवर्तनकारी परिणाम प्राप्त झाले आहेत आणि गरीब आणि वंचितांना लाभ झाला आहे. 
#11YearsOfGaribKalyan"

***

SonalT/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2134075)