आयुष मंत्रालय
योग संगम 2025 भारताला एकत्र आणणार : 30,000 हून अधिक संघटना या चळवळीत होणार सहभागी
Posted On:
04 JUN 2025 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2025
भारताच्या समग्र आरोग्यासाठी वाढत्या वचनबद्धतेचा एक शक्तिशाली पुरावा म्हणजे,आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) 2025 चा मुख्य कार्यक्रम - योग संगम – असणार आहे. योग संगममध्ये देशभरातील 30,000 पेक्षाही अधिक संघटनांनी नोंदणीचे प्रस्ताव सादर करून आता एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.
आंतरराष्ट्रीय दिनाचा 2025 चा मुख्य कार्यक्रम मागील वर्षीप्रमाणेच आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये देशभरात आयोजित केलेल्या असंख्य कार्यक्रमांचे ‘ऑनलाइन ट्रॅकिंग’ करण्याची अतिरिक्त सुविधा आहे. आयुष मंत्रालयाच्या योग पोर्टलवर योग संगममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या पोर्टलवर इच्छुक संस्था आंतरराष्ट्रीय दिन कार्यक्रमाच्या नोंदणी करण्यासाठी त्यांचे प्रस्ताव नोंदवू शकतात.
प्रस्तावांच्या नोंदणीच्या बाबतीत हा प्रचंड प्रतिसाद म्हणजे, योगाभ्यासाचा केवळ एक सराव म्हणून देशव्यापी स्वीकार केला जात असल्याचे दिसून येते.त्याबरोबरच जीवनशैलीविषयी निर्माण झालेली सजगता, सामुदायिक लवचिकता आणि राष्ट्रीय कल्याणासाठी योग ही एक चळवळ बनली आहे. शाळा आणि रहिवासी कल्याण संघटना (आरडब्ल्यूए) पासून ते कॉर्पोरेट,स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्था, भारताच्या कानाकोपऱ्यातील संस्था योग संगमच्या बॅनरखाली एकत्र येत आहेत, तसेच 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याच्या हेतूने नोंद करीत आहेत.
यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण राष्ट्र सज्ज होत असताना, 2025 वर्षाची संकल्पना, "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" अशी आहे. भौगोलिक, संस्कृती आणि व्यवसायांच्या पलीकडे जाणारी एकसंधतेला प्रेरणा देणारी ही चळवळ आहे. लडाखच्या बर्फाच्छादित पर्वतांपासून ते केरळच्या सूर्यप्रकाशमय समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, शाळेच्या खेळाच्या मैदानांपासून आणि कार्यालयांच्या लॉनपासून ते रेल्वे स्थानके आणि ऐतिहासिक मंदिरांच्या प्रांगणांपर्यंत, भारत श्वास आणि गतीने एकत्र येत आहे, हे विशेष आहे.
आयआयटी, आयआयएम आणि केंद्रीय विद्यापीठांसारख्या प्रमुख संस्थांच्या सक्रिय सहभागामुळे या चळवळीत नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेची ही केंद्रे केवळ मोठ्या प्रमाणात योग प्रात्यक्षिके आयोजित करत नाहीत तर मानसिक स्पष्टता, भावनिक कणखरपणा आणि नेतृत्व विकासासाठी योग एक साधन म्हणून प्रचार करत आहेत.
योग संगमात कसे सहभागी व्हावे:
या संकेतस्थळाला भेट द्या: yoga.ayush.gov.in/yoga-sangam
तुमच्या गटाची किंवा संघटनेची नोंदणी करा
21 जून 2028 रोजी योग सत्र आयोजित करा
अधिकृत प्रशंसा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कार्यक्रमानंतर सहभागाची माहिती अपलोड करा
21 जून रोजी, देशभरातील एक लाखाहून अधिक ठिकाणांचे आरोग्य आणि कल्याणाच्या चैतन्यशील केंद्रात रूपांतर होईल - हे प्रत्येक ठिकाण भारताच्या प्राचीन ज्ञानाचा आणि संपूर्ण आरोग्याच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या आधुनिक निर्धाराचा संकल्प प्रतिध्वनी करेल.
चला आपण एकत्र येऊन ‘स्वस्थ भारत, समृद्ध भारत’ हा आपला सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करूया. आपण योग संगमला भारताच्या समग्र आरोग्य आणि राष्ट्रीय कल्याण चळवळीचा आधारस्तंभ बनवूया.
S.Patil/S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134001)