कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे 04.06.225 रोजी 13 वे पेन्शन अदालत भरणार


दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या 415 कौटुंबिक निवृत्ती वेतन तक्रारींचे करणार निवारण

तक्रारींचे जलद निराकरण सुनिश्चित करण्यासाठी तसेच कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांचा सन्मान आणि आर्थिक सुरक्षितता वाढविण्यासाठी वचनबद्ध

Posted On: 03 JUN 2025 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जून 2025

 

निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग 04.06.2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे "कौटुंबिक निवृत्ती वेतन" या संकल्पनेवर आधारित 13 वे  पेन्शन अदालत भरवण्‍यात येणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हे अदालत भरणार आहे. 19 विभाग/मंत्रालयाच्या अखत्यारीतील कौटुंबिक निवृत्ती वेतन प्रकरणांशी संबंधित 415 तक्रारींचे प्रस्ताव  या न्यायालयामध्ये मांडण्यात येणार  आहेत.  

S. No.

Concerned Ministry/Department

Pendency

1.

Central Board of Direct Taxes (Income Tax)

3

2. 

Central Board of Indirect Taxes and Customs

2

3.

Department of Agriculture Research and Education

1

4.

Department of Commerce

1

5.

Department of Defence Finance

8

6.

Department of Defence Production

1

7.

Department of Defence Research and Development

1

8.

Department of Ex Servicemen Welfare

62

9.

Department of Expenditure

1

10.

Department of Financial Services
(Banking Division)

12

11.

Department of Personnel and Training

1

12.

Employees Provident Fund Organisation

3

13.

Ministry of Civil Aviation

2

14.

Ministry of External Affairs

1

15.

Ministry of Home Affairs

40

16.

Ministry of Housing and Urban Affairs

1

17.

 

 

18.

Ministry of Railways (Railway Board)

5

19.

 

 

20.

O/o the Comptroller & Auditor General
of India

2

21.

PCDA(P) Prayagraj

268

Total

415

 

कौटुंबिक निवृत्ती वेतन सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे किंवा प्रक्रियात्मक विलंबामुळे निवृत्ती वेतनाची प्रक्रिया आणि वितरण योग्यरित्या न झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिलेल्या निवृत्ती वेतनधारकांच्या दीर्घकालीन आणि प्रदीर्घकाळ प्रलंबित तक्रारींचे निराकरण करून निवृत्ती वेतनधारकांच्या योग्य देणींची पूर्तता करणे सुलभ होईल, अशी कल्पना आहे.

 

* * *

S.Bedekar/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2133639)