भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

निवडणूक आयोग ‘व्हीटीआर शेअरिंग’ प्रक्रिया अद्ययावत करणार

Posted On: 03 JUN 2025 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जून 2025

 

केंद्रीय निवडणूक आयोग आता अंदाजे मतदान टक्केवारीची   ताजी आकडेवारी उपलब्ध करून देण्यासाठी एक सुव्यवस्थित, तंत्रज्ञानाभिमुख  प्रणाली सादर करत आहे. ही नवीन प्रक्रियेमुळे  पूर्वीच्या हाताने, प्रत्यक्ष आकडेवारी प्रसिद्ध करताना लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.  हा उपक्रम वेळेवर सार्वजनिक संप्रेषण  सुनिश्चित करण्याच्या आयोगाच्या वचनबद्धतेला अनुरूप  आहे, यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अनेकदा विविध प्रसंगी अधोरेखित केले आहे.

या नवीन उपक्रमांतर्गत, प्रत्येक मतदान केंद्राचे मतदान अधिकारी आता मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी नवीन ECINET अॅपवर  मतदानाच्या टक्केवारीची थेट नोंद करतील जेणेकरून अंदाजे मतदान कल संबंधी ताजी आकडेवारी देताना होणारा विलंब कमी होईल. मतदारसंघ स्तरावर आपोआप ते एकत्रित केले जाईल. पूर्वीप्रमाणेच दर दोन तासांनी अंदाजे मतदान टक्केवारी  प्रकाशित केली जाईल. उल्लेखनीय बाब म्हणजे, मतदान केंद्र सोडण्यापूर्वी, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांकडून  मतदानाची आकडेवारी आता ECINET मध्ये प्रविष्ट केली जाईल ज्यामुळे विलंब कमी होईल आणि मतदान संपल्यानंतर मतदारांच्या अंदाजे टक्केवारी नेटवर्क कनेक्टिव्हिटी उत्तम असेल तर अपडेटेड  VTR अॅपवर उपलब्ध असेल,  याची खातरजमा  होईल . जिथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसेल तिथे आकडेवारी ऑफलाइन प्रविष्ट केली जाईल आणि कनेक्टिव्हिटी पूर्ववत झाल्यावर अपडेट  होईल. बिहार निवडणुकीपूर्वी हे नूतनीकृत व्हीटीअर अॅप ECINET चा अविभाज्य भाग बनेल.

यापूर्वी, मतदान आकडेवारीचा डेटा क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून हातांनी गोळा केला जात असे आणि माहिती फोन कॉल, एसएमएस किंवा मेसेजिंग अॅप्सद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी" कडे पाठवली जात असे. ही माहिती दर दोन तासांनी एकत्रित केली जात असे आणि व्होटर टर्नआउट (व्हीटीआर) अॅपवर अपलोड केली जात असे.

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2133610)