दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल कनेक्टीव्हिटीसाठी मालमत्ता मानांकन नियमावली 2024” अंतर्गत मालमत्तांच्या मानांकनावरील ट्रायच्या मसुदा मार्गदर्शक पुस्तिके वर भागधारकांकडून टिप्पण्या आणि प्रति-टिप्पण्या सादर करण्यासाठी मुदतवाढ

Posted On: 02 JUN 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2025

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) 13 मे 2025 रोजी "डिजिटल कनेक्टीव्हिटीसाठी मालमत्ता मानांकन नियमावली 2024" अंतर्गत डिजिटल जोडणीसाठी मालमत्तांच्या मानांकनाच्या मुल्यांकनाकरिता 'मसुदा मार्गदर्शक पुस्तिका' जारी केली होती. भागधारकांच्या टिप्पण्या आणि प्रति-टिप्पण्या सादर करण्याच्या अंतिम तारखा यापूर्वी अनुक्रमे 2 जून 2025 आणि 9 जून 2025 निश्चित करण्यात आल्या होत्या.

वर नमूद केलेल्या 'मसुदा मार्गदर्शक पुस्तिकेवर' टिप्पण्या सादर करण्यासाठी भागधारकांकडून मिळालेल्या विनंत्या लक्षात घेऊन, भागधारकांना प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळ देण्यासाठी टिप्पण्या सादर करण्याची अंतिम तारीख एक आठवडा म्हणजेच 9 जून 2025 पर्यंत आणि प्रति-टिप्पण्यासाठीची  मुदत  16 जून 2025 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पण्या/प्रतिक्रिया, शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, ja2-qos1@trai.gov.in या ई-मेल आयडीवर आणि त्याची एक प्रत adv-qos1@trai.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवता येतील.

भागधारकांना कोणत्याही स्पष्टीकरणासाठी किंवा अधिक माहितीसाठी तेजपाल सिंग, सल्लागार (QoS-I), ट्राय यांच्याशी +91-11-20907759 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

N.Chitale/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2133337)