कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित कृषी संकल्प अभियानच्या चौथ्या दिवशी शिवराज सिंह चौहान यांचे उत्तरप्रदेशमधील मेरठमध्ये आगमन


शिवराज सिंह चौहान यांनी पारंपरिक चारपाईवर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला

प्रविष्टि तिथि: 01 JUN 2025 6:50PM by PIB Mumbai

 

विकसित कृषी संकल्प अभियानाच्या चौथ्या दिवशी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी आज उत्तर प्रदेशातील मेरठ येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. मेरठच्या डभथुवा गावात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नंतर जांगेठी गावात पारंपरिक `चारपाई`वर अनौपचारिक चर्चा केली.

या प्रसंगी माध्यमांशी बोलताना  चौहान यांनी सांगितले की, कृषी शास्त्रज्ञांच्या समितीसह त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ही भेट घेतली आहे. गावांमधील चौकांमध्ये चर्चा घेण्यामागील उद्दिष्ट आधुनिक शेती पद्धतींचा प्रचार करणे हे आहे.

मंत्र्यांनी उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे, शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि तोटा टाळणे या बाबतीत प्रयत्न अधिक तीव्र करण्याची गरज यावेळी अधोरेखित केली. याच बाबी 'विकसित कृषी संकल्प अभियान'चे मुख्य उद्दिष्ट आहेत, असे त्यांनी सांगितले.

***

S.Patil/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2133195) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , Urdu , Punjabi , English , Gujarati , Tamil , Malayalam