अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2025 (आर्थिक वर्ष 2025-26) साठी केंद्र  सरकारच्या जमाखर्चाचा मासिक आढावा

प्रविष्टि तिथि: 30 MAY 2025 6:22PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारचा एप्रिल 2025 साठी मासिक लेखा एकत्रित करून  अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत:-

केंद्र सरकारला एप्रिल 2025 साठी 2,79,288 कोटी रुपये (एकूण मिळकतीच्या अर्थसंकल्पीय अंदाज 2025-26  च्या 8.0%) प्राप्त झाले आहेत ज्यामध्ये  करापोटी मिळालेला महसूल (केंद्र सरकारला मिळालेला निव्वळ  महसूल ) 1,89,669 कोटी रूपये, कराव्यतिरिक्तच्या महसूलापोटी मिळालेले 67,160  कोटी रूपये आणि कर्जाव्यतिरिक्तची भांडवली मिळकत म्हणून मिळालेले 22,459 कोटी रूपये आहेत जे कर्जवसुलीमुळे मिळाले आहेत.  या कालावधीत केंद्र सरकारने करांमधील वाट्याचे हस्तांतरण म्हणून 81,735  कोटी रुपये राज्य सरकारांना हस्तांतरित केले आहेत जे मागील वर्षापेक्षा 11,860 कोटी रुपयांनी अधिक आहेत.

केंद्र सरकारचा एकूण खर्च 4,65,620 कोटी रुपये (2025-26 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 9.2%) आहे, त्यापैकी 3,05,830 कोटी रुपये महसूल खात्यावर आणि 1,59,790  कोटी रुपये  भांडवली खात्यावर आहेत. एकूण महसूल खर्चापैकी 93,460  कोटी रुपये व्याज देयकांवर आणि28,955 कोटी रुपये प्रमुख अनुदानांपोटी खर्च झाले  आहेत.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2132929) आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil