सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

साहित्यातून प्रेरणा घेउून त्यातील  आदर्श साकार करण्यासाठी लोक प्रयत्नशील असतात :  राष्‍ट्रपती  द्रौपदी मुर्मू


राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्‍ये  राष्ट्रीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Posted On: 29 MAY 2025 8:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात, साहित्य परिषदेचे उद्घाटन  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.  सरकारच्या सांस्कृती मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या  साहित्य अकादमीच्या वतीने आणि  राष्ट्रपती भवनाच्या सहकार्याने  “किती बदलले आहे साहित्य?".या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्याच्या  उद्घाटन कार्यक्रमानिमित्त देशभरातील मान्यवर  लेखक, कवी आणि साहित्यिक विचारवंतांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, राष्ट्रपती मुर्मू यांनी लेखकांबद्दल आपल्याला आयुष्यभर वाटत असलेला आदर व्यक्त करत त्यांची प्रशंसा केली.  तसेच राष्ट्रपती भवनात साहित्यिकांचे  सर्वांचे  स्वागत करण्याची आपली  तीव्र इच्छा होती असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी बोलताना  स्वत:ला आवडलेली पुस्तके आणि त्‍यांच्या लेखकाविषयी माहिती दिली.  त्या पुढे म्हणाल्या की, आजचे साहित्य हे उपदेशात्मक साहित्य आहे, असे म्हणता येणार नाही कारण ते कुणाच्या ना कुणाच्या अनुभवावर आधारित असते.

Image

उद्घाटन समारंभाच्या सुरुवातीला, विशेष सचिव आणि आर्थिक सल्लागार  रंजना चोप्रा यांनी उपस्थितांशी संवाद  साधताना साहित्य अकादमी ही संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वात प्रमुख संस्थांपैकी एक आहेअशा शब्दांत अकादमीचा गौरव केला.

Image

उद्घाटन समारंभानंतर "स्ट्रेट फ्रॉम द हार्ट" म्हणजेच ‘’अगदी थेट हृदयापासून...’’  या मंत्रमुग्ध करणाऱ्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.  ज्यामध्ये विविध भारतीय भाषांमधील कवींनी भाग घेतला. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी सर्व कवींना मानवस्त्र देऊन सन्मानित केले.

Image

***

S.Bedekar/S.Patgoankar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2132678)