पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी मध्य प्रदेश दौऱ्यावर
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भोपाळ येथे आयोजित लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात पंतप्रधान होणार सहभागी
मध्य प्रदेशात सर्वत्र हवाई वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बांधलेल्या दतिया आणि सतना विमानतळाचे पंतप्रधान करणार उद्घाटन
इंदूर मेट्रोच्या यलो लाईनच्या सर्वोच्च प्राधान्य मार्गिकेवरील प्रवासी सेवांचाही पंतप्रधान करणार प्रारंभ
Posted On:
30 MAY 2025 11:15AM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 30 मे 2025
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी 11.15 च्या सुमारास ते भोपाळमध्ये लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तिकरण महासंमेलनात सहभागी होणार आहेत. या शिवाय त्यांच्या हस्ते भोपाळमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार असून ते सार्वजनिक कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत.
लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तिकरण महासंमेलनात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. लोकमाता देवी अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचे आणि विशेष नाण्याचेही ते अनावरण करतील. 300 रुपयांच्या नाण्यावर अहिल्याबाई होळकर यांचे चित्र असेल. आदिवासी, लोककला आणि पारंपरिक कलांमधील योगदानाबद्दल महिला कलाकाराला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय देवी अहिल्याबाई पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे.
अगदी शेवटच्या टोकापर्यंत हवाई प्रवासाची सोय उपलब्ध होण्यास चालना देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या दतिया आणि सतना विमानतळांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणात येणार आहे, त्यामुळे विंध्य प्रदेशात उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील.
शहरांमधील प्रवासी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या आपल्या कटिबद्धतेच्या अनुषंगाने, पंतप्रधान इंदूर मेट्रोच्या यलो लाइनच्या सर्वोच्च प्राधान्य मार्गावरील प्रवासी सेवांचे उद्घाटन करतील. यामुळे वाहतूक आणि प्रदूषण कमी होईल, अशी अपेक्षा असून प्रवाशांचा प्रवासही अधिक सुखकारक होईल.
पंतप्रधानांच्या हस्ते 1,271 अटल ग्राम सुशासन भवनांच्या बांधकामासाठी 480 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा पहिला हप्ताही हस्तांतरित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना प्रशासकीय कामकाजाचे व्यवस्थापन, बैठका घेणे आणि अधिक कार्यक्षमतेने नोंदी ठेवणे अशा कामासाठी या इमारतींची मदत होण्यासोबतच कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उपलब्ध होईल.
***
S.Bedekar/M.Ganoo/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2132664)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam