कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
राष्ट्रीय अनुभव पुरस्कार योजना, 2025 अंतर्गत निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ऑगस्ट महिन्यात होणार अनुभव पुरस्कारांचे वितरण
42 मंत्रालये/विभाग/संघटनांद्वारा प्रकाशित 1459 लेखांमधून 5 अनुभव पुरस्कार आणि 10 ज्युरी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार
पहिल्यांदाच, सीपीएसई आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी राष्ट्रीय अनुभव पुरस्कार योजनेत सहभागी होत अंतिम यादीत पटकावले स्थान
Posted On:
28 MAY 2025 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने मार्च 2015 मध्ये निवृत्त होणाऱ्या/निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे सरकारसोबत काम करतानाचे अनुभव सामायिक करण्यासाठी 'अनुभव' हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला.
त्यानंतर,निवृत्त होणाऱ्या/निवृत्त कर्मचाऱ्यांना लेखनातून त्यांचे अनुभव सादर करण्यास उद्युक्त करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 59 अनुभव पुरस्कार आणि 19 ज्युरी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.

राष्ट्रीय अनुभव पुरस्कार योजना,2025 अधिसूचित करण्यात आली आणि ती अनोखी होती कारण पहिल्यांदाच, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (सीपीएसई) आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (पीएसबी) कर्मचाऱ्यांनाही राष्ट्र उभारणीतील त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले. 01.04.2024 ते 31.03.2025 पर्यंत प्रकाशित झालेल्या लिखाणाचा या योजनेत विचार करण्यात आला.
‘अनुभव आऊटरिच प्रोग्राम’ मध्ये बारकाईने परीक्षण करून, 2023 मध्ये 30 मंत्रालये/विभाग/संघटना यांचे लेख प्रकाशित झाले होते, तर यंदा 42 मंत्रालये/विभाग/संघटना यांच्याकडून एकूण 1459 लेख प्रकाशित झाले.
त्यानंतर, प्रकाशित लेखांची द्विस्तरीय तपासणी योग्य प्रक्रियेनंतर पूर्ण करण्यात आली, ज्यामुळे 05 अनुभव पुरस्कार विजेते आणि 10 ज्युरी प्रमाणपत्र विजेते अंतिम केले गेले.
अनुभव पुरस्कार विजेत्यांमध्ये पुढील निवृत्त व्यक्तींचा समावेश आहे - हुकुम सिंह मीना, अतिरिक्त सचिव, भूमी संसाधन विभाग; शालिनी कक्कर, सीजीएम, एसबीआय; एम. वेंकटेशन, ओएसडी टू एमओ (पीएमओ); ओ. विरुपाक्षप्पा, टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक आणि साजू पी.के., हेड कॉन्स्टेबल, सीआरपीएफ.
जय प्रकाश श्रीवास्तव संचालक, बीएचईएल; विनोद पी, शास्त्रज्ञ जी, डीआरडीओ; डॉ. जॉली धर, विख्यात शास्त्रज्ञ, अंतराळ विभाग; सुनीता चेरोदथ, विशेष महासंचालक, दूरसंचार विभाग; साबू सेबॅस्टियन एम, शास्त्रज्ञ जी, डीआरडीओ; वेलगा कुमारी, उपसंचालक, जल शक्ती मंत्रालय; संतोष गवळी, हेड कॉन्स्टेबल जीडी, आयटीबीपी; बालम सिंग रावत, उपकमांडंट, सीआरपीएफ; एस. मीनाक्षी सुंदरम, निरीक्षक/फार्मासिस्ट, सीआरपीएफ आणि शीला राणी पोद्दार एसआय/जीडी, सीआरपीएफ हे निवृत्त होणारे कर्मचारी आहेत ज्यांना ज्युरी प्रमाणपत्रासाठी निवडण्यात आले आहे.
अनुभव पुरस्कार आणि ज्युरी प्रमाणपत्रे 18.08.2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात राज्यमंत्री (पीपी), डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रदान केली जातील.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2132180)