केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला

Posted On: 23 MAY 2025 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 मे 2025

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत (i)  ऑक्टोबर, 2025 पासून सुरू होणारा * ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नई, 122 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स (एनटी) (यूपीएससी) (पुरुषांसाठी) आणि (ii) ^ ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नई, 36 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला (नॉन-टेक्निकल) (यूपीएससी) कोर्स, या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी  घेण्यात आलेली संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2024, आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारावर लागलेल्या निकालानुसार, अंतिम निवड झालेल्या 574 (*510 + ^64) उमेदवारांची गुणवत्तेनुसार यादी पुढील प्रमाणे आहे. 122 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स (एनटी) (यूपीएससी) (पुरुषांसाठी) च्या यादीत, इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, डेहराडून, इंडियन नेव्हल अॅकॅडमी, एझिमाला, केरळ आणि एअरफोर्स अॅकॅडमी, हैदराबाद (प्री-फ्लाईंग) ट्रेनिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी, याच परीक्षेच्या निकालाच्या आधारावर यापूर्वी शिफारस केलेल्या उमेदवारांची नावेही समाविष्ट आहेत.

सरकारने सूचित केलेल्या रिक्त पदांची संख्या  (I)  122 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स (एनटी) (यूपीएससी) (पुरुषांसाठी) साठी 276  आहे आणि (II) 36 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन वुमन (नॉन टेक्निकल) (यूपीएससी) कोर्स  साठी 19 आहे.

गुणवत्ता यादी तयार करताना उमेदवारांच्या वैद्यकीय परीक्षेचा निकाल विचारात घेण्यात आलेला नाही. सर्व उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. या उमेदवारांची जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रतेची पडताळणी लष्कराच्या मुख्यालयामार्फत केली जाईल.

उमेदवारांना यूपीएससी च्या पुढील वेबसाइटवर निकालासंदर्भात माहिती मिळेल: http://www.upsc.gov.in. तथापि, उमेदवारांचे गुण अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध होतील आणि 30 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध राहतील.

आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शिफारस न केलेल्या उमेदवारांचे गुण आणि इतर तपशील जाहीर करण्याबाबतच्या योजनेकडेही उमेदवारांचे लक्ष वेधण्यात आले आहे. असे शिफारस नसलेले उमेदवार आपले गुण डाऊनलोड करताना इतर पर्याय वापरू शकतील.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकुलात परीक्षा कक्षाच्या इमारतीजवळ सुविधा केंद्र आहे. उमेदवारांना कामाच्या दिवशी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान प्रत्यक्ष, अथवा दूरध्वनीवर 011-23385271, 011-23381125 आणि 011-23098543 या क्रमांकावर संपर्क साधून त्यांच्या परीक्षेसंदर्भात कोणतीही माहिती अथवा स्पष्टीकरण मिळवता येईल. त्याशिवाय, उमेदवारांनी दूरध्वनी क्रमांक 011-26175473 वर संपर्क साधावा, अथवा Joinindianarmy.nic.in for IMA/OTA  course, अथवा 011-23010097 / ईमेल: officer-navy[at]nic[dot]in, अथवा Joinindiannavy.gov.in, for INA course, आणि 011-23010231 (विस्तारित क्र. 7645 / 7646 / 7610) येथे संपर्क साधावा, अथवा www.careerindianairforce.cdac.in for AFA course येथे भेट द्यावी.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करावे:

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2130912)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil