गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांचे समावेशक शासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
समावेशनाला चालना : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेत दिव्यांग व्यक्तींना 4% आरक्षण
Posted On:
22 MAY 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2025
सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण वाटचालीत पंतप्रधानांच्या सबका साथ, सबका विकास या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आणि सुगम्य भारत अभियानांतर्गत सर्व नागरिकांना समान संधी देण्याच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी समावेशक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
दिव्यांगजन अधिकार अधिनियम, 2016 नुसार, दिव्यांग व्यक्तींना केंद्र सरकारच्या गृहनिर्माण सुविधांमध्ये सुलभ प्रवेश सुनिश्चित करण्यासंदर्भात मालमत्ता संचालनालयाने कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे.
या अनुषंगाने,केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या घरकुल वाटपात दिव्यांग व्यक्तींना 4% आरक्षण दिले जाणार असून सार्वजनिक सेवांमध्ये समानता, सन्मान आणि सुगम्यतेच्या दिशेने हे उल्लेखनीय पाऊल ठरणार आहे.
हा निर्णय प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्याप्रति सरकारची वचनबद्धता दर्शवतो त्याच बरोबर सर्वसमावेशक आणि सुलभ भारताचा पाया बळकट करणारा आहे.
S.Kane/M.Ganoo/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2130572)