गृह मंत्रालय
पद्म पुरस्कार-2026 साठी नामांकने 31 जुलै , 2025 पर्यंत दाखल करता येणार
Posted On:
20 MAY 2025 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2025
प्रजासत्ताक दिन 2026 निमित्त घोषित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार -2026 साठी नामांकन/शिफारशी सादर करण्यास 15 मार्च 2025 पासून सुरुवात झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने /शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in ) ऑनलाइन दाखल करता येतील .
पद्म पुरस्कार म्हणजेच पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. हा पुरस्कार देऊन 'उत्कृष्ट कार्याचा' गौरव केला जातो. पद्म पुरस्कार कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रे/विषयांमध्ये विशिष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी/सेवेसाठी दिला जातो. जाती, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणारे सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.
पद्म पुरस्कारांना "जनतेचे पद्म" पुरस्कार बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणून, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी स्व-नामांकनासह नामांकन/शिफारशी देखील कराव्यात. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्यांपैकी अशा प्रतिभावान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत ज्यांची उत्कृष्टता आणि कामगिरी खरोखरच दखल घेण्यास पात्र आहे.
नामांकने /शिफारशींमध्ये उपरोक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट सर्व संबंधित तपशील असावेत, ज्यात शिफारस केलेल्या व्यक्तीची संबंधित क्षेत्र /सेवेतील विशिष्ट आणि अतुलनीय कामगिरी/सेवा वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) स्पष्टपणे मांडलेली असावी.
या संदर्भातील तपशील 'पुरस्कार आणि पदके' या शीर्षकाखालील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2129897)
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam