गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे अहमदाबाद महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

Posted On: 18 MAY 2025 8:53PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे अहमदाबाद महानगरपालिकेच्या  विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. याप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोदी सरकारने प्रथम सर्जिकल स्ट्राईक, नंतर हवाई हल्ले आणि आता आपल्या देशातील महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसून टाकणाऱ्या दहशतवाद्यांचा खातमा करून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे शहा यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूरने एकाच वेळी अनेक प्रकारच्या समस्यांना उत्तर दिले आहे, असेही ते म्हणाले. पाकिस्तान पूर्वी संपूर्ण जगाला सांगत असे की आपल्या देशात कोणतेही दहशतवादी वास्तव्यास नाहीत आणि दहशतवादी कारवाया नाहीत. पण जेव्हा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपली क्षेपणास्त्रे तिथे डागण्यात आली आणि दहशतवाद्यांचा खात्मा झाला तेव्हा संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पडला, असे शहा म्हणाले. जेव्हा पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते, तेव्हा पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तान आणि दहशतवादाचे संबंध संपूर्ण जगासमोर उघड झाले आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी अड्डे आहेत ही गोष्ट संपूर्ण जगाला कळली, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.

अमित शाह यांनी सांगितले की, आज एकाच वेळी 1550 कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन होत आहे. या कामांमध्ये 31 उद्घाटने, 60  भूमिपूजन आणि तीन संकुलांमध्ये 1070 हून अधिक कुटुंबांना स्वतःचे घर  देणे यांचा समावेश आहे.

त्यांनी या भागातील युवकांना विनंती केली की, जसे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईप्रति  कृतज्ञता व्यक्त करत तिच्या नावाने झाड लावले, त्याचप्रमाणे अहमदाबादमधील प्रत्येक युवकाने आपल्या आईच्या नावाने झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे.

ते म्हणाले की, आपल्या आईच्या स्मृतीत लावलेले झाड ही पृथ्वीमातेचे ऋण फेडण्याची एक पद्धत ठरेल.  शाह यांनी सांगितले की, अहमदाबाद महानगरपालिकेने 40 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.

ते म्हणाले की, जर प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावले, तर येणाऱ्या काळात अहमदाबादमध्ये जागतिक तापमान  वाढीचा प्रभाव निम्म्यापेक्षा अधिक प्रमाणात कमी करण्यामध्ये यश मिळू शकते.

***

S.Kane/S.Mukhedkar/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2129528)
Read this release in: English , Hindi , Gujarati