अल्पसंख्यांक मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी कोचीहून पहिल्या हज 2025 विमानाला झेंडा दाखवून केले रवाना
Posted On:
16 MAY 2025 7:57PM by PIB Mumbai
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आज 2025 च्या हज यात्रेसाठी कोची येथून हज यात्रेकरूंच्या पहिल्या विमानाला हिरवा झेंडा दाखवला. प्रारंभ ठिकाणापाशी यात्रेकरूंना संबोधित करताना मंत्र्यांनी प्रवास सुरळीत, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कुरियन यांनी यात्रेकरूंना आश्वासन दिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार या यात्रेदरम्यान त्यांच्या आराम आणि कल्याणाची खात्री करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. "जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावास आणि सौदी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वैद्यकीय सहाय्य आणि लॉजिस्टिक सहाय्यासह सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत जेणेकरून तीर्थयात्रेचा अनुभव त्रासमुक्त होईल," असे ते म्हणाले.

यात्रेकरूंशी संवाद साधताना मंत्र्यांनी हज यात्रा अधिक समावेशक आणि कार्यक्षम करण्यासाठी सरकारतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला . त्यांनी नमूद केले की या वर्षी लागू करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांमध्ये अर्ज प्रक्रियेचे डिजिटायझेशन, निवडीमध्ये वाढलेली पारदर्शकता आणि प्रारंभ ठिकाणी सुधारित सुविधांचा समावेश आहे, ज्यामुळे देशभरातील नागरिकांसाठी हज प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

यात्रेला निघालेल्या भाविकांनी केंद्र सरकारच्या सुधारणांबद्दल त्यांचे आभार मानले. सुधारित पायाभूत सुविधा, डिजिटल नवोन्मेष आणि इतर सुधारणांसह हज 2025 हा यात्रेकरूंच्या पवित्र प्रवासात आणखी एक मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा आहे.
***
S.Kane/N.Mature/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129222)