वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
गुणवत्ता नियंत्रण आदेशाने (क्यूसीओ) उद्योगाचा पाठिंबा मिळवला आहे, कारण त्याने भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सहाय्य केले आहे - केंद्रीय मंत्री पियुष गोयल
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2025 3:52PM by PIB Mumbai
आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या प्रत्येक क्यूसीओ, अर्थात गुणवत्ता नियंत्रण आदेशाला उत्पादन क्षेत्राचा पाठिंबा मिळाला आहे, कारण त्याने केवळ उत्पादनाची गुणवत्ताच सुधारली नसून, भारतीय उत्पादकांना मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी सहाय्यक ठरले आहेत , असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या हितधारकांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. विद्युत उपकरणांसाठी क्यूसीओच्या अंमलबजावणीच्या महत्त्वावर भर देताना त्यांनी ही माहिती दिली. ग्राहकांची सुरक्षा आणि उद्योगांना स्पर्धात्मकता प्रदान करणारी प्रणाली तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या बैठकीत डीपीआयआयटीने 20 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचित केल्यानुसार, ‘घरगुती, व्यावसायिक आणि तत्सम विद्युत उपकरणांच्या सुरक्षेसाठी’ समांतर क्यूसीओची अंमलबजावणी करताना उद्योगासमोर येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
उद्योगाने आपल्या समस्या मांडल्या आणि विविध विद्युत उपकरणांवर समांतर क्यूसीओच्या अंमलबजावणीत त्यांना येणाऱ्या अडचणी नमूद केल्या . भारतात केवळ उच्च गुणवत्तेची उत्पादने तयार करून विकली जावीत, यासाठी क्यूसीओ लागू करण्याच्या निर्णयाला उद्योगांनी भरभरून पाठिंबा दिला. तथापि, जागतिक पुरवठा साखळीतील गुंतागुंत लक्षात घेऊन, सर्वात प्रथम तयार मालावर क्यूसीओ लागू करावा, आणि त्यानंतर घटक आणि कच्च्या मालावरील क्यूसीओ अधिसूचित करावा अशी त्यांनी विनंती केली. त्याचप्रमाणे त्यांनी अनुपालन कालमर्यादेशी जुळवून घेण्यासाठी देशांतर्गत उत्पादन क्षमता आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचे मॅपिंग करण्याची शिफारस केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी उद्योगाने उपस्थित केलेल्या समस्यांची नोंद घेतली, आणि क्यूसीओच्या अंमलबजावणीची मुदत वाढवण्याच्या विनंतीवर, तसेच लीगसी स्टॉक च्या मुद्द्यावर विचार करायला सहमती दर्शवली.
उद्योगांनी सरकारी अनुदानित प्रयोगशाळा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील प्रयोगशाळा आणि राज्य सरकारी संस्थांमधील प्रयोगशाळा, या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानासह अधिकाधिक चाचणी सुविधा उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती त्यांनी केली, जेणेकरून संपूर्ण भारतातील उद्योगासाठी मजबूत आणि सुलभ चाचणी पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2129107)
आगंतुक पटल : 7