उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 15 मे रोजी जयपूरच्या दौऱ्यावर जाणार
उपराष्ट्रपती जयपूरमध्ये भैरोंसिंह शेखावत स्मृती वाचनालयाचे उद्घाटन करणार
Posted On:
14 MAY 2025 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2025
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड राजस्थानमधील जयपूर येथे एकदिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या या दौऱ्यात उपराष्ट्रपती धनखड, जयपूरमध्ये माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या पुण्यतिथीनिमित्त, भैरोसिंह शेखावत स्मृती वाचनालयाचे उद्घाटन करतील. भैरोसिंह शेखावत यांनी 19 ऑगस्ट 2002 ते 21 जुलै 2007 या कालावधीत भारताचे 11 वे उपराष्ट्रपती म्हणून तसेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून काम पाहिले. भैरोसिंह शेखावत यांनी 1952 साली राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणून सार्वजनिक जीवनात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर तीन वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला.
भैरोसिंह शेखावत यांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड नवी दिल्ली येथून विशेष विमानाने जयपूरला रवाना होतील, आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने विद्याधर नगर स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, खासदार मदन राठोड आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128606)