राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 11 MAY 2025 6:04PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे : -

बुद्ध पौर्णिमेच्या पावन प्रसंगी, मी सर्व देशवासीयांना आणि जगभरातील भगवान बुद्धांच्या अनुयायांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देते.

करुणेचे मूर्त स्वरूप असणाऱ्या भगवान बुद्धांनी दिलेला अहिंसा, प्रेम आणि दयाभावाचा अमर संदेश मानवजातीच्या कल्याणाचा मूलभूत मंत्र आहे. त्यांचे आदर्श समता, सुसंवाद आणि सामाजिक न्याय या शाश्वत मूल्यांवर आपला विश्वास बळकट करतात. त्यांची शिकवण आपल्याला नैतिकतेवर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा देते.

आपण आपल्या जीवनात भगवान बुद्धांच्या आदर्शांचा स्वीकार करुया तसेच शांततापूर्ण, सुसंवादी आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान देऊया”.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-

***

M.Jaybhaye/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2128169) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam