वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी ‘अपेडा’कडून लवकरच विकासात्मक धोरणाची आखणी
भारतातील कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांचा बाजारपेठेतील प्रवेश सुलभ व्हावा आणि परिचालनातील खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध
Posted On:
04 MAY 2025 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2025
भारतातील कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांचा बाजारपेठेतील प्रवेश सुलभ व्हावा तसेच परिचालनातील खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असे वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या चिंतन शिबिरात सांगितले. कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी ‘अपेडा’कडून विकासात्मक धोरणाची आखणी सुरू असल्याचे या शिबिरात सांगण्यात आले.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी भारताच्या कृषी-निर्यात क्षमतेला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, उद्योग भागधारक आणि शेतकरी समुदायांमधील समन्वयात्मक प्रयत्नांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि अपेडा यांनी वाणिज्य भवन येथे आयोजित केलेल्या या वैशिष्टट्यपूर्ण चिंतन शिबिरात केंद्र सरकार, राज्य सरकारे, उद्योजक आणि संबंधित मंत्रालयातील अधिकारी अशा 70 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी संवाद साधला.
या शिबिराचे पाच समांतर तांत्रिक ‘ब्रेक आऊट’ सत्रांमध्ये वर्गीकरण करण्यात आले, ज्यामध्ये पुढील कृषी-व्यापार वस्तू आणि प्रक्रिया केलेले अन्न या क्षेत्रांवर अधिक भर देण्यात आला.
- बासमती आणि बिगर-बासमती तांदूळ:
- प्राणीजन्य उत्पादने:
- बागायती
- प्रक्रिया केलेले अन्न:
- सेंद्रिय उत्पादने:
* * *
S.Bedekar/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2126742)