पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवानंद बाबा यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
04 MAY 2025 11:55AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगसाधक आणि काशीचे रहिवासी शिवानंद बाबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे :
योगसाधक आणि काशीचे रहिवासी शिवानंद बाबा यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. योगाभ्यास आणि साधनेला समर्पित असलेले त्यांचे जीवन प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. योगाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक सेवेबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
शिवानंद बाबांचे शिवलोकात जाणे हे आपल्या सर्व काशीवासीयांसाठी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या लाखो लोकांसाठी एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. या दु:खदप्रसंगी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.”
* * *
S.Bedekar/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2126689)
आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam