सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी एनसीईएल, एनसीओएल आणि बीबीएसएसएल या कृषी संस्थांच्या प्रगतीचा घेतला आढावा
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी एनसीईएलला साखर, त्रिपुरातील सुगंधी तांदूळ, सेंद्रिय कापूस आणि भरड धान्यांच्या निर्यातीसाठी नवीन संधींचा शोध घेण्याचे दिले निर्देश
अमित शाह यांनी आखाती देशांमध्ये ताज्या भाज्या आणि विशेष जातींच्या बटाट्याच्या निर्यातीसाठी मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी करण्याबाबत केली सूचना
अमित शहा यांनी एनसीईएलसाठी 2 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले आणि सध्या निर्यात न होणाऱ्या तीन नवीन आणि विशिष्ट उत्पादनांच्या निर्यातीबाबत चाचपणी करण्याचे दिले निर्देश
केंद्रीय गृहमंत्र्यांनी साखरेची अधिक मात्रा आणि कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या उसाच्या वाणांवर काम करण्याच्या आवश्यकतेवर दिला भर
Posted On:
03 MAY 2025 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल), नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (एनसीओएल) आणि इंडियन सीड कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (बीबीएसएसएल) या कृषी संस्थांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीला सहकार मंत्रालयाचे सचिव, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अनुपम कौशिक, विपुल मित्तल आणि चेतन जोशी (अनुक्रमे एनसीईएल, एनसीओएल आणि बीबीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक) उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे "सहकारातून समृद्धी" हे स्वप्न साकार करण्यासाठी, सहकार मंत्रालयाने अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम आणि ऐतिहासिक योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे सहकार क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे.

एनसीईएल (नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड):
अमित शाह यांनी राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित संस्था म्हणजेच एनसीईएलला सहकारी साखर कारखान्यांमधून साखर, त्रिपुरामधील सुगंधी तांदूळ, सेंद्रिय कापूस आणि भरड धान्य निर्यातीसाठी नवीन संधींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. आखाती देशांमध्ये ताज्या भाज्या आणि विशेष जातींच्या बटाट्याच्या निर्यातीसाठी मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी करण्याबाबत प्रस्ताव देखील मांडला.
अमित शहा यांनी एनसीईएलसाठी 2 लाख कोटी रुपये मूल्याच्या निर्यातीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले आणि सध्या भारतातून निर्यात न होणाऱ्या तीन नवीन आणि विशिष्ट उत्पादनांच्या निर्यातीचा शोध घेण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश दिले. यासोबतच, सर्व सहकारी संस्थांची निर्यात एनसीईएलद्वारे करण्याचे निर्देश शाह यांनी दिले जेणेकरून सुमारे 20,000-30,000 कोटी रुपयांची उलाढाल आणि कर आणि परिचालन खर्चानंतरचा निव्वळ नफा सहकारी संस्थांकडे परत जाऊ शकेल.
अमित शहा यांनी डाळींच्या आयातीसाठी आफ्रिका आणि म्यानमारमध्ये एनसीईएल कार्यालये स्थापन करण्याची आणि सहकारी सदस्यांना जागतिक मागणी समजून घेण्यास आणि त्यांची पुरवठा क्षमता सामायिक करण्यास सक्षम बनवण्यासाठी एक समर्पित संकेतस्थळ विकसित करण्याची सूचनाही केली.
एनसीईएलची स्थापना बहु-राज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत करण्यात आली होती आणि पहिल्या वर्षात तिने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, त्यांनी 10,000 हून अधिक सहकारी संस्थांना सदस्यत्व दिले आणि 4,283 कोटी रुपयांची उलाढाल करत 122 कोटी रुपयांचा निव्वळ नफा देखील कमावला.
एनसीईएलने आपल्या निर्यातीचा 28 देशांमध्ये विस्तार केला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने बासमती आणि बिगर बासमती तांदूळ, सागरी उत्पादने( विशेषतः कोळंबी), भरड धान्ये, गहू, फळे आणि भाजीपाला, प्राणीज उत्पादने, मसाले आणि वनस्पतीलागवडीची उत्पादनांचा समावेश आहे. संस्थेने सेनेगल, इंडोनेशिया आणि नेपाळमधील 61 आयातदारांशी धोरणात्मक करार (सामंजस्य करार) देखील केले आहेत.
एनसीओएल (नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड):
एनसीओएलने खरेदी केलेली सेंद्रीय उत्पादने अमूल, बिगबास्केट सारख्या मोठ्या ब्रँडना पुरविली जात असल्याने आपोआपच भारतामध्ये सेंद्रिय उत्पादने पुरवठा करणा-या ब्रँडला प्रमाण आणि किंमतीच्या बाबतीत अधिक फायदा होत आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले. त्यांची उत्पादने लवकरच भारतभरातील रिलायन्स स्टोअरमध्ये उपलब्ध होतील, असेही अमित शहा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, 'भारत ऑरगॅनिक्स' या ब्रँड ची 22 उत्पादने सध्या दिल्ली-एनसीआर भागात उपलब्ध असून ती इतर मोठ्या महानगरांमध्ये सादर करण्याचा विचार आहे. उत्पादनांमध्ये तृणधान्ये, कडधान्ये, मसाले आणि मिठाई उत्पादनांचा समावेश आहे.
अमित शहा यांनी एनसीओएल च्या प्रयत्नांचे कौतुक केले तसेच आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये 300 कोटी रुपयांहून अधिक उलाढालीचे लक्ष्य निर्धारित केले. राज्यस्तरावर प्रमाणित सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना उच्च पातळीवर एकत्रित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.ब्रँडचे वेगळेपण त्याच्या 'अस्सलपणा आणि टिकाऊपणा' मध्ये आहे, उत्पादनाच्या प्रत्येक बॅचची त्यामध्ये कीटकनाशकांचे अवशेष नाहीत ना हे पडताळून पाहण्यासाठी 'ऑरगॅनिक इंडिया'च्या मानकांनुसार चाचणी केली जाते आणि त्याचा अहवाल ग्राहकांसोबत QR कोडच्या स्वरूपात सामायिक केला जातो. हा ग्राहक केंद्रित उपक्रम या उद्योगात प्रथमच राबविण्यात येत आहे.
बीबीएसएसएल (भारतीय बीज सहकारी संस्था मर्यादित):
गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी भारतातील बियाणे परिसंस्था बळकट करण्यात बीबीएसएसएलची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करताना सांगितले की, पहिल्या 10 केळी उत्पादक राज्यांमध्ये उत्कृष्ट जनुकीय क्षमता असलेल्या वनस्पतींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ऊती संवर्धन सुविधा स्थापित करणे आवश्यक आहे. गुजरातमधील कलोल येथे अलीकडेच स्थापन करण्यात आलेले बीबीएसएसएलचे अत्याधुनिक केंद्र तूर, उडीद, मका या पिकांचे अधिक उत्पादन देणारी, कमी अवधीत तयार होणारी आणि कमी पाण्याची आवश्यकता असलेले वाण विकसित करण्यावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखरेचे अधिक प्रमाण आणि पाण्याची कमी आवश्यकता असलेल्या उसाच्या जाती विकसित करण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. अमित शाह यांनी ‘बीबीएसएसएल’ ला लच्का चारा पिकांचे बियाणे एनडीडीबी आणि अमूल नेटवर्कद्वारे विक्रीसाठी विकसित करण्याचे आवाहन केले. बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत बटाट्यांसारख्या वाणांवर प्रक्रिया करण्यासाठी, विशेषतः फ्रेंच फ्राईजसाठी बियाणे उत्पादनाला चालना देण्यावर अमित शहा यांनी भर दिला. ब्रीडर बियाणे वेळेवर उपलब्ध होतील याची खबरदारी घेण्यासाठी सहकार मंत्रालयाने कृषी मंत्रालयाशी समन्वय साधून आवश्यक प्रजनन बियाणांचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश केंद्रीय सहकार मंत्र्यांनी दिले.
मंत्र्यांनी बीबीएसएसएलच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि नावीन्यपूर्ण, दर्जेदार निविष्ठा आणि संस्थात्मक समर्थनाद्वारे कृषी सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
* * *
S.Bedekar/Sushma/Manjiri/D.Rane
(Release ID: 2126686)
Visitor Counter : 17