WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अमृतस्य: वेव्हज शिखर परिषद, 2025 मध्ये मध्य प्रदेशने केले राज्याच्या समृद्ध कलात्मक वारशाचे प्रदर्शन

 Posted On: 02 MAY 2025 9:07PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 2 मे 2025

 

वेव्हज शिखर परिषद, 2025 च्या दुसऱ्या दिवशी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (जेडब्ल्यूसीसी), मुंबई येथे "अमृतस्य : मध्य प्रदेश" या सादरीकरणाने सांस्कृतिक वारशाचे नेत्रदीपक प्रदर्शन घडविले. या भव्य प्रदर्शनाने मध्य प्रदेशच्या कलात्मक भावनेला एक जिवंत आदरांजली वाहिली, राज्याच्या विविध नृत्य परंपरांचे चमकदार प्रदर्शन करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या प्रदर्शनात भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांचे आणि  या राज्यातील लोककला  आणि आदिवासी परंपरांसह आकर्षक मिश्रण दाखवण्यात आले. रंग, लय आणि वेधक हालचालींनी समृद्ध असलेल्या या सादरीकरणातून राज्याची सांस्कृतिक ओळख परिभाषित करणाऱ्या परंपरेच्या अमर भावनेवर प्रकाश टाकण्यात आला.

वेव्हज शिखर परिषदेमधील प्रेक्षकांना नृत्याद्वारे वारसा आणि कथाकथनाचे कौशल्यपूर्ण मिश्रण करणाऱ्या उच्च-ऊर्जा सादरीकरणाचा आस्वाद घेता आला. देशभरातील सांस्कृतिक प्रतिनिधी, मान्यवर आणि कलाप्रेमींकडून उत्साही टाळ्या आणि व्यापक कौतुकाने या सादरीकरणाचे स्वागत करण्यात आले.

अमृतस्यने भारताच्या विविध कलात्मक वारशाचे एक चैतन्यशील केंद्र म्हणून मध्य प्रदेशचे स्थान पुन्हा अधोरेखित केले आणि वेव्हज शिखर परिषद, 2025 च्या व्यापक उद्दिष्टांमध्ये एक प्रतिध्वनी युक्त सांस्कृतिक आयाम जोडला.

 

* * *

PIB Mumbai |S.Bedekar/N.Mathure/D.Rane


Release ID: (Release ID: 2126347)   |   Visitor Counter: 20