WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजनाचे जागतिक केंद्र म्हणून भारताला अग्रेसर करण्यासाठी

 Posted On: 30 APR 2025 8:51PM |   Location: PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2025

 

प्रस्तावना

1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज  2025 - जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर  परिषदेच्या निमित्ताने सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या ऐतिहासिक उत्सवासाठी सज्ज व्हा. केंद्र सरकारद्वारे आयोजित अशा प्रकारचा हा पहिलाच जागतिक कार्यक्रम आहे जो भारतातील ऊर्जाशील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला प्रकाशझोतात आणत आहे आणि या निमित्ताने  जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरचे रूपांतर  कल्पनाशक्ती, नवोन्मेष  आणि संधींच्या गतिमान केंद्रात झाले आहे.

वेव्हज 2025 साठी 1,100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींसह 100,000  हून अधिक नोंदणी झाली आहे. यामध्ये जगभरातील  चित्रपट निर्माते, तंत्रज्ञान प्रणेते, निर्माते, गुंतवणूकदार आणि उद्योग धुरिण मनोरंजनाचे भविष्य घडवण्यासाठी एकत्र येत आहेत.  दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पासून ते सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई सारख्या  तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणींपर्यंत विविध क्षेत्रातील दूरदर्शी प्रतिभावंत कौशल्य आणि महत्त्वाकांक्षेच्या या अभूतपूर्व प्रदर्शनासाठी एकत्र आले आहेत.

ही केवळ एक शिखर परिषद नाही तर भारताला जागतिक सर्जनशील आणि डिजिटल महाशक्ती बनवण्याची एक चळवळ आहे. क्रिएट इन इंडिया चॅलेंज, अत्याधुनिक प्रदर्शने, स्टार्टअप पिचेस , सांस्कृतिक सादरीकरणे आणि उच्च-स्तरीय संवाद यासारख्या आकर्षक वैशिष्ट्यांसह , वेव्हज 2025 भविष्याच्या दिशेने एक धाडसी पाऊल आहे - जिथे संस्कृतीचा  संहितेशी  आणि परंपरेचा परिवर्तनाशी मेळ साधला जाणार आहे.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1

क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) हा भारतातील आशय निर्मात्यांना  सक्षम बनवण्यासाठी एक धोरणात्मक उपक्रम आहे. नवोन्मेष  आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध  करून, सीआयसी भारताच्या क्रिएटर्सची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा, सॉफ्ट पॉवर वाढवण्याचा आणि जागतिक मान्यतेसाठी उदयोन्मुख प्रतिभेला स्थान देण्याचा प्रयत्न करते. हा उपक्रम कौशल्यांचे परीसंपत्तीत रुपांतर करण्यासाठी पाठबळ  देतो तसेच माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या वाढीत योगदान देतो.

सीआयसी सर्जनशील, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रातील 32 अनोख्या  आव्हानांचे दर्शन घडवते. 22 ऑगस्ट 2024 रोजी प्रारंभ  झालेल्या या स्पर्धेत भारत आणि जगभरातून मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून  आला! या आव्हानांमध्ये 60 हून अधिक देशांमधून प्रवेशिका आल्या आहेत, ज्यातून  या अग्रगण्य उपक्रमाचे जागतिक आकर्षण आणि व्याप्ती  प्रतिबिंबित होते. या अपवादात्मक प्रतिभावंतांमधून 750 अंतिम स्पर्धकांना त्यांची सर्जनशील कौशल्ये आणि सामर्थ्य  प्रदर्शित करण्याची संधी दिली जाणार आहे.  वेव्ह्ज 2025 चा भाग म्हणून, क्रिएटोस्फीअर या खास तयार  केलेल्या मंचावर अॅनिमेशन, कॉमिक्स, एआय , एक्सआर , गेमिंग, संगीत आणि अन्य  क्षेत्रातील अभिनवतेचे दर्शन घडणार आहे.  या आव्हानांच्या विजेत्यांना कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी एका भव्य रेड कार्पेट समारंभात प्रतिष्ठित 'वेव्हज क्रिएटर अवॉर्ड्स' प्रदान केले जातील.

1. वेव्हज प्रोमो व्हिडिओ चॅलेंज: व्हिडिओच्या माध्यमातून वेव्हज 2025 चा गाभा आणि महत्त्वाकांक्षा  प्रदर्शित करणाऱ्या  शक्तिशाली आणि प्रेरणादायी दृकश्राव्य सामग्रीचा  शोध घेण्यासाठी आयोजित केलेली ही  एक अनोखी स्पर्धा आहे.

एकूण नोंदणी

164

अंतिम स्पर्धक

3

 

2. ट्रुथ टेल हॅकेथॉन: चुकीची  माहिती खोडून काढण्यासाठी आणि विश्वासार्ह पत्रकारितेला चालना देण्यासाठी  एआय सोल्यूशन्स विकसित करण्याचे आवाहन टेक इनोव्हेटर, डेटा तज्ञ आणि माध्यम  व्यावसायिकांना करण्यात आले होते.

एकूण नोंदणी

5650

आंतरराष्ट्रीय नोंदणी

186

अंतिम स्पर्धक

5

 

3. कम्युनिटी रेडिओ कंटेंट चॅलेंज: भारतातील कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सची सर्जनशीलता, नवोन्मेष आणि प्रभाव साजरा करणे आणि प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने ही उत्कंठावर्धक स्पर्धा आयोजित केली आहे.

एकूण नोंदणी

246

आंतरराष्ट्रीय नोंदणी

14

 

4. वेव्हज हॅकेथॉन ऍड स्पेंड ऑप्टिमायझर: सहभागींनी डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग वापरून जाहिरातदारांना अधिक हुशार, डेटा-चालित निर्णय घेण्यास मदत करणारे उपाय तयार करण्यावर काम केले. गुंतवणुकीवर अधिकाधिक परतावा आणि विपणन उद्दिष्टांना पाठबळ देणे हा यामागचा उद्देश होता.

एकूण नोंदणी

115

आंतरराष्ट्रीय नोंदणी

1

 

5. मेक द वर्ल्ड वेअर खादी: भारताचा समृद्ध वस्त्र वारसा जागतिक फॅशन ट्रेंड्सशी जोडून, जाहिरात व्यावसायिक आणि फ्रीलान्सर्सना आव्हानाचा रोमांचक अनुभव देणे.

एकूण नोंदणी

770

अंतिम स्पर्धक

5

 

6. वाह उस्ताद: भारताचा समृद्ध संगीत वारसा जतन आणि संवर्धन करताना हिंदुस्थानी, कर्नाटकी आणि भावपूर्ण सूफी संगीतातील असाधारण प्रतिभा जोपासणे.

एकूण नोंदणी

300

आंतरराष्ट्रीय नोंदणी

3

 

7. बॅटल ऑफ द बँडस: उद्योगात सामुदायिक भावना, नवोन्मेश आणि विकासाची भावना संवर्धित करत, सर्जनशीलता आणि संगीताची अत्युच्च सीमा गाठण्याच्या दृष्टीने आखलेला कार्यक्रम.

एकूण नोंदणी

200

 

8. सिम्फनी ऑफ इंडिया:  विविध प्रकारच्या सांगीतिक सादरीकरणाद्वारे संगीत रसिकांच्या व्यापक अभिरुचीचा उत्सव साजरा करणारा कार्यक्रम.

एकूण नोंदणी

212

 

9. थीम म्युझिक स्पर्धा: गीतकार, गायक, कलाकार आणि संगीतकारांना भारतीय शास्त्रीय संगीताशी साधर्म्य असणारे अथवा शास्त्रीय आणि समकालीन वाद्ये आणि शैलींचे मिश्रण असलेले संगीत तयार करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

एकूण नोंदणी

212

उपविजेते

4

विजेता

1

 

10. रेझोनेट EDM चॅलेंज:  इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) निर्मितीमधील जागतिक प्रतिभेला प्रकाशात आणणे आणि त्याचा उत्सव साजरा करणे, संगीत निर्मिती आणि लाइव्ह परफॉर्मन्समध्ये सहयोग, नवोन्मेश आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम "क्रिएट इन इंडिया" मिशनला अनुसरून आहे, ज्यामध्ये भारताला जागतिक सर्जनशीलता आणि मनोरंजनाचे केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात आले आहे.

एकूण नोंदणी

394

आंतरराष्ट्रीय नोंदणी

10

अंतिम स्पर्धक

10

 

11. इंडिया अ बर्ड्स आय व्ह्यू: 2 ते 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये भारताचे विलोभनीय सौंदर्य आणि विविधता टिपण्यासाठी उत्साही ड्रोन पायलट आणि चित्रपट निर्मात्यांना आमंत्रित करण्यात आले होते, ज्यामध्ये हवाई ड्रोन सिनेमॅटोग्राफीच्या अनोख्या दृष्टीकोनातून देशाचे दर्शन घडवले.  

एकूण नोंदणी

1324

अंतिम स्पर्धक

5

 

12. अँटी पायरसी चॅलेंज: ही स्पर्धा फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग तंत्रज्ञानात स्थानिक कंपन्यांनी तयार केलेल्या नवोन्मेशी उपायांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यावर केंद्रित आहे.

एकूण नोंदणी

1600

अंतिम स्पर्धक

7

 

13. कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप: हौशी आणि व्यावसायिक कलाकारांसाठी कॉमिक मेकिंग स्पर्धा.

एकूण नोंदणी

1560

अंतिम स्पर्धक - व्यावसायिक श्रेणी

5

अंतिम स्पर्धक - हौशी श्रेणी

5

 

14. वेव्ह्स अॅनिमे एन्ड मंगा चॅलेंज: भारतात मंगा आणि अॅनिमेमधील वाढत्या रुचीला प्रोत्साहन देण्यासाठीचा अभिनव उपक्रम.

एकूण नोंदणी

2400

आंतरराष्ट्रीय नोंदणी

7

उपविजेते

3 (5 वेगवेगळ्या श्रेणी)

विजेता

7 (5 वेगवेगळ्या श्रेणी)

 

15. अॅनिमेशन फिल्ममेकर्स कॉम्पिटीशन: अॅनिमेशन क्षेत्रात भारतातील कथाकारांच्या प्रतिभेला संधी देणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

एकूण नोंदणी

1290

आंतरराष्ट्रीय नोंदणी

19

अंतिम स्पर्धक

42

 

16. गेम जॅम: भारताच्या गेम डेव्हलपर्सना आपली सृजनशीलता आणि नवोन्मेश प्रदर्शित करण्याची रोमांचक संधी देणारी स्पर्धा.     

एकूण नोंदणी

5569

अंतिम स्पर्धक

10

 

17. ईस्पोर्ट्स टूर्नामेंट: ई-फुटबॉल आणि वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप (डब्ल्यूसीसी) स्पर्धांचे गट-वार आयोजन आणि प्रत्येक थरारक स्पर्धेच्या विजेत्या संघाला वेव्हजमध्ये सन्मानित केले जाईल.

एकूण नोंदणी

35008

अंतिम स्पर्धक (सर्व टप्पे)

10

 

18. सिटी क्वेस्ट: शेड्स ऑफ भारत: भारताच्या नागरी विकासाचा उत्सव साजरा करणारा शैक्षणिक खेळ.

एकूण नोंदणी

2594

आंतरराष्ट्रीय नोंदणी

15

 

19. XR क्रिएटर हॅकेथॉन: ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या सीमा पार करण्यासाठी भारतभरातील प्रतिभावंतांना आमंत्रित करणारी स्पर्धा.

एकूण नोंदणी

2205

विजेता (सर्व थीम)

5

 

20. इनोव्हेट2एज्युकेट हँडहेल्ड डिव्हाइस चॅलेंज: शिक्षण तज्ज्ञ, डिझाइनर, अभियंते आणि नवोन्मेशींना शैक्षणिक हँडहेल्ड डिव्हाइसची प्रतिकृती विकसित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ही प्रतिकृती गणित शिकणे, कोडे सोडवणे आणि बौद्धिक कौशल्यांना चालना देण्याची प्रक्रिया मजेदार आणि संवादात्मक बनवेल.     

एकूण नोंदणी

1826

आंतरराष्ट्रीय नोंदणी

513

अंतिम स्पर्धक

10

 

21. एआय अवतार क्रिएटर चॅलेंजः  वैयक्तिक, संवाद साधणारी डिजिटल व्यक्तिमत्वे जी आभासी अवकाशात मानवी प्रभावकर्त्यांसोबत व्यवहार करतील अशा प्रकारचे एआय अवतार तयार करण्यावर या स्पर्धेचा भर आहे.

एकूण नोंदणी

1324

आंतरराष्ट्रीय नोंदणी

100

 

22. वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार: ऍनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि संबंधित क्षेत्रांमधील उत्कृष्ट शोरील्स आणि ॲडफिल्म्सना गौरवणारी एक प्रतिष्ठेची स्पर्धा, जी सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा सन्मान करत आहे.

एकूण नोंदणी

1331

आंतरराष्ट्रीय नोंदणी

63

 

23. भारत टेक ट्रायम्फ कार्यक्रम: सर्वोत्कृष्ट गेमिंग आणि इंटरॅक्टिव्ह मनोरंजन नवोन्मेषकांचा शोध घेणारी आणि त्यांचे सक्षमीकरण  करणारी स्पर्धा.

एकूण नोंदणी

1078

आंतरराष्ट्रीय नोंदणी

12

विजेता

20

 

24. वेव्हज व्हीएफएक्स स्पर्धा: सहभागींना असा दृश्य परिणाम क्रम किंवा लघुपट तयार करण्याचे कार्य देण्यात आले होते, ज्यामध्ये असाधारण शक्ती असलेला एक सुपरहिरो असेल, पण त्या शक्तींचा वापर रोजच्या, सामान्य जीवनातील व्यवहारा संदर्भात केला जाईल.

एकूण नोंदणी

1367

अंतिम स्पर्धक

14

 

25. वेव्हज कॉमिक क्रॉनिकल्स: या स्पर्धेत कोणत्याही निवडलेल्या विषयावर आधारित कॉमिक सबमिशन मागवण्यात आले होते, ज्यामध्ये किमान 60 पॅनेल असणे आवश्यक होते, आणि प्रत्येक  इमेज किंवा दृश्य एका पॅनेलचे प्रतिनिधित्व करेल.

एकूण नोंदणी

1145

आंतरराष्ट्रीय नोंदणी

62

अंतिम स्पर्धक

50 (जनरल आणि स्टुडन्ट ट्रॅक या दोन्हींमध्ये)

 

26. वेव्हज एक्सप्लोरर: भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि सर्जनशीलतेचे प्रदर्शन करण्यासाठी एका चित्तवेधक सफरीवर सहभागींना आमंत्रित केले होते. सहभागींनी भारताच्या त्यांच्या आवडत्या पैलूंना अधोरेखित करणारे यूट्युब व्हिडिओ (1 मिनिटांपर्यंत) किंवा व्हीलॉग (7 मिनिटांपर्यंत) तयार केले.

एकूण नोंदणी

6932

आंतरराष्ट्रीय नोंदणी

30

 

27. रील मेकिंग स्पर्धा: खाद्यपदार्थ, प्रवास, फॅशन, नृत्य, संगीत, गेमिंग, योग आणि निरामयता तसेच तंत्रज्ञान यांसारख्या थीमवर आकर्षक रील्स तयार करण्यासाठी सहभागींना आमंत्रित केले होते.

एकूण नोंदणी

7812

आंतरराष्ट्रीय नोंदणी

55

 

28. यंग फिल्ममेकर्स चॅलेंज: या स्पर्धेचा उद्देश युवा सहभागींमध्ये संक्षिप्त 60-सेकंदांच्या चित्रपटाच्या स्वरूपात नवोन्मेष, कथाकथन कौशल्ये आणि डिजिटल साक्षरता वाढवणे हा होता.

एकूण नोंदणी

905

आंतरराष्ट्रीय नोंदणी

2

 

29. फिल्म पोस्टर निर्मिती स्पर्धा: भारताच्या समृद्ध चित्रपट पोस्टर वारशाचा बहुमान करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि डोळ्यांना सुखावणारी आकर्षक पुनर्निर्मित चित्रपट पोस्टर्स तयार करण्याची एक अनोखी संधी.

एकूण नोंदणी

543

आंतरराष्ट्रीय नोंदणी

29

अंतिम स्पर्धक

50

विजेता

3

 

30. ट्रेलर निर्मिती स्पर्धा: अनुभवी आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांना नेटफ्लिक्स वरील आशयाचा वापर करून आकर्षक ट्रेलर तयार करण्यासाठी आमंत्रित केले होते, ज्यामुळे त्यांना गाजलेल्या दृश्यांविषयी  पुनर्कल्पना करण्याची किंवा नवीन दृष्टिकोन सादर करण्याची संधी मिळाली. 

एकूण नोंदणी

3500

आंतरराष्ट्रीय नोंदणी

36

अंतिम स्पर्धक

20

 

31. अनरियल सिनेमॅटिक्स चॅलेंज: टीव्हीएजीएद्वारे आयोजित अनरिअल सिनेमॅटिक्स चॅलेंजने कलाकार, ॲनिमेटर आणि कंटेंट क्रिएटर्सना अनरिअल इंजिनचा वापर करून त्यांचे कथाकथन आणि तांत्रिक कौशल्ये दर्शवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. 

एकूण नोंदणी

700

आंतरराष्ट्रीय नोंदणी

1


32. वेव्हज कॉसप्ले चॅम्पियनशिप: अंतिम दिवशी सहभागींना त्यांचे कौशल्य सादर करण्यासाठी एकत्र आणणारा, पॉप संस्कृती, सर्जनशीलता आणि कारागीरीचा एक भव्य उत्सव.  यात भारतीय इतिहास, मांगा, ॲनिमे, कॉमिक्स आणि गेम्स यांसारख्या शैलींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 

एकूण नोंदणी

513

आंतरराष्ट्रीय नोंदणी

3

अंतिम स्पर्धक

29

 

निष्कर्ष

वेव्हज 2025 ची महाअंतिम फेरी तोंडावर असताना,  जगभरातील हजारो सहभागी त्यांची सर्जनशीलता, नवोन्मेष आणि प्रतिभा दर्शवण्यासाठी एकत्र येत आहेत. विविध प्रकारच्या स्पर्धांमुळे आणि सहकार्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ मिळाल्याने, वेव्हज भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्यावर एक चिरस्थायी प्रभाव टाकण्यासाठी सज्ज आहे.

संदर्भ

Kindly find the pdf file

 

* * *

N.Chitale/S.Kakade/Sushma/Rajshree/Shailesh/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Release ID: (Release ID: 2125612)   |   Visitor Counter: 7

Read this release in: English , Hindi , Gujarati , Tamil