संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू चीफ ऑफ इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफ पदावरून निवृत्त

Posted On: 30 APR 2025 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2025

 

लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू हे जवळपास चार दशकांचा सेवाकाळ पूर्ण करून 30 एप्रिल 2025 रोजी चीफ ऑफ इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफ पदावरून (सीआयएससी) निवृत्त झाले. आजच्या निवृत्तीच्या दिवशी, त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र  अर्पण केले आणि शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली. साउथ ब्लॉक लॉनमध्ये त्यांना तीनही सेनादलांकडून मानवंदना देखील देण्यात आली.

   

एप्रिल 2023 पासून ते  सीआयएससी पदावर होते, या काळात त्यांनी  तिन्ही सेवांमध्ये एकता आणि समन्वय वाढवला. लेफ्टनंट जनरल मॅथ्यू यांनी या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विश्वासार्ह क्षमता प्राप्त करण्यासाठी संरक्षण सायबर एजन्सी आणि संरक्षण अंतराळ एजन्सीच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान दिले.  त्यांनी सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून भारतीय  संरक्षण उद्योग आणि शैक्षणिक संस्थांसोबत  सहकार्याला प्रोत्साहन दिले. डिफेंस सर्विस स्टाफ कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट, मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधील प्रमुख सुधारणांचे नेतृत्व तसेच अभ्यासक्रमाचा आढावा घेण्यापासून ते महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यापर्यंत, त्यांनी सशस्त्र दलांमध्ये विविधता आणि समावेशकता  वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शेजारील देशांसोबत संरक्षण सहकार्य कायम राखण्यासाठी आणि प्रादेशिक स्थैर्य  आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी, लेफ्टनंट जनरल मॅथ्यू यांनी विविध मंचांवर भारतीय सशस्त्र दलांचे प्रतिनिधित्व केले. तसेच  सशस्त्र दलांच्या मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण क्षमता वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

डिसेंबर 1985 मध्ये पंजाब रेजिमेंटमध्ये रुजू झालेले जनरल ऑफिसर 9, जानेवारी 2022  रोजी रेजिमेंटचे कर्नल बनले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2125569) Visitor Counter : 15