संरक्षण मंत्रालय
स्वातंत्र्यदिन सोहळा-2025 च्या अनुषंगाने ग्यानपथावर वेगवेगळ्या प्रकारचे आकृतीबंध आरेखन स्पर्धेचे संरक्षण मंत्रालय आणि मायजीओव्ही कडून राष्ट्रीय स्तरावरील आयोजन
Posted On:
30 APR 2025 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2025
स्वातंत्र्य दिन सोहळा 2025 च्या (आयडीसी -2025) तयारीचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालय, माय गव्हर्मेंटच्या सहकार्याने, 1 मे ते 15 मे 2025 दरम्यान ‘ज्ञानपथावर विविध प्रकारचे आकृतीबंध आरेखन स्पर्धा’ आयोजित करणार आहे. या स्पर्धेचा उद्देश देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतातील युवा तसेच नागरिकांमध्ये सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा आहे. सहभागींना राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवक आणि शालेय विद्यार्थ्यांद्वारे तयार केल्या जाणाऱ्या योग्य पार्श्वभूमीसह एका रचनेची संकल्पना व आरेखन करावे लागेल, जी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील ज्ञानपथ येथे आयडीसी 2025 दरम्यान प्रदर्शित केली जाईल. यासाठी इच्छुक, आपल्या कल्पनांकरिता मागील वर्षांच्या रचनांचे संदर्भ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी, कृपया या संकेतस्थळाला भेट द्या: https://www.mygov.in/
स्पर्धेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- पहिल्या तीन विजेत्या प्रवेशिकांना प्रत्येकी ₹10,000/- रोख रकमेचे बक्षीस
- सर्वोत्कृष्ट 250 सहभागींना, त्यांच्या प्रत्येकी एका साथीदारासह (पालक/पती-पत्नी/ नातेवाईक), लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन 2025 सोहळ्यासाठी ई-निमंत्रण प्राप्त होईल.
- सर्व सहभागींना मायगव्हद्वारे ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
अटी व शर्ती:
- स्पर्धेत भाग घेणारा भारताचे नागरिक हवा.
- एक व्यक्ती फक्त एकदाच भाग घेऊ शकते.
- प्रवेशिका JPG/PDF किंवा मायगव्हर्मेंट पोर्टलच्या आवश्यकतेनुसार इतर कोणत्याही स्वरुपामध्ये, हस्तलिखित किंवा संगणकीकृत असाव्यात. स्पर्धेसाठी डिझाईनतयार करताना कोणत्याही इमेज/लोगोचा संदर्भ घेतल्यास, सहभागीने अंतिम डिझाइनसोबत संदर्भित इमेज अपलोड करणे आवश्यक आहे.
- स्पर्धेत भाग घेताना कोणत्याही अनुचित/खोट्या मार्गांचा/गैरप्रकारांचा म्हणजेच दुसऱ्याच्या नावाने सहभाग, दुहेरी सहभाग इत्यादींचा अवलंब केल्यास संबंधित व्यक्तीचा सहभाग रद्द केला जाईल.
- कोणत्याही कॉपीराइट केलेल्या इमेजचा वापर करू नये आणि त्यासंबंधी एक हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. ते सादर न केल्यास निवड रद्दबातल ठरवली जाईल. याव्यतिरिक्त, स्पर्धेचे आयोजक किंवा त्यांच्या वतीने काम करणारी कोणतीही संस्था या संदर्भात सर्व अधिकार राखून ठेवते.
- आयडीसी -2025 दरम्यान एका स्पर्धेसाठी/प्रश्नमंजुषेसाठी एकापेक्षा जास्त सहभागींद्वारे एकच मोबाईल नंबर आणि एकच ईमेल आयडी वापरला जाऊ शकत नाही.
- संरक्षण मंत्रालय केवळ कार्यक्रमासाठी ई-निमंत्रण जारी करेल आणि आयडीसी -2025 मध्ये उपस्थित राहण्यासाठीचा प्रवास, निवास, भोजन इत्यादींशी संबंधित सर्व खर्च व्यक्तीला स्वतःच करावा लागेल.
- स्पर्धेच्या आयोजनाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेले कर्मचारी स्पर्धेत भाग घेण्यास पात्र नाहीत. ही पात्रतेची अट त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही लागू होते.
- संरक्षण मंत्रालयातील एका नियुक्त छाननी समितीद्वारे प्रवेशिकांच्या तपासणीच्या आधारावर विजेत्यांची घोषणा केली जाईल.
- कोणत्याही सहभागीने सादर केलेले डिझाइन संरक्षण मंत्रालयाद्वारे लाल किल्ल्यावरील ज्ञानपथच्या डिझाइनच्या उद्देशासाठी अंशतः किंवा पूर्णपणे वापरले जाऊ शकते. उपरोक्त स्पर्धेत सादर केलेल्या डिझाइनच्या कॉपीराइटसाठी कोणताही दावा सहभागींद्वारे कधीही केला जाणार नाही.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125459)
Visitor Counter : 12