संरक्षण मंत्रालय
संरक्षण उत्पादनासाठी उद्योग आणि गुणवत्ता हमीचा अवलंब या विषयावर नवी दिल्ली येथे दोन दिवसांची संवादात्मक कार्यशाळा संपन्न
Posted On:
28 APR 2025 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2025
संरक्षण उत्पादनासाठी उद्योग 4.0 आणि गुणवत्ता हमी (क्यूए) 4.0 चा अवलंब या विषयावर संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण उत्पादन विभाग यांनी 24 आणि 25 एप्रिल 2025 रोजी गुणवत्ता हमी महासंचालनालय मुख्यालय येथे दोन दिवसांची संवादात्मक कार्यशाळा आयोजित केली होती. सार्वजनिक क्षेत्रातील विविध संरक्षण उद्योगांमध्ये ऑटोमेशनच्या अंमलबजावणीसाठी बारकावे विचारात घेणे आणि एकमेकांच्या अनुभवातून शिकणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन संरक्षण मंत्रालय/संरक्षण विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (भूमी प्रणाली) डॉ. गरिमा भगत यांनी केले. जागतिक दर्जाच्या संरक्षण उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी उद्योग 4.0 आणि क्यूए 4.0 चा अवलंब करण्यासाठी आयओटी, बिग डेटा अॅनालिटिक्स, एआय आणि ब्लॉक चेन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संरक्षण मंत्रालय डीपीएसयू आणि उद्योगांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे असे डॉ. भगत यांनी अधोरेखित केले. संवादात्मक कार्यशाळेदरम्यान, डीजीक्यूएचे महासंचालक एन. मनोहरन यांनी माहिती दिली की 8 मे 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील संरक्षण गुणवत्ता परिषद आयोजित करण्यात आली आहे ज्यामध्ये उद्योग 4.0 आणि क्यूए 4.0 स्वीकारण्याबाबत दृष्टिकोन प्रकाशित केला जाईल आणि या विषयावर तज्ञांच्या गटाची चर्चा होईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार 'सुधारणांचे वर्ष' उपक्रमांतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2124901)
Visitor Counter : 13