संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी विशिष्ट बँक खात्यावर देणगी पाठवण्याबाबत दिशाभूल करणारा व्हॉट्सॲप संदेश

Posted On: 27 APR 2025 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2025

 

भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी आणि युद्धात जखमी किंवा शहीद झालेल्या सैनिकांसाठी विशिष्ट बँक खात्यावर देणगी पाठवण्याबाबत व्हॉट्सॲपवर एक दिशाभूल करणारा संदेश सातत्याने फिरत आहे. या संदेशात मंत्रिमंडळाचा याबाबतच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे आणि या प्रस्तावाचे मुख्य अनुमोदक म्हणून अभिनेता अक्षय कुमार यांचे नाव गोवले जात आहे.

या संदेशातील खात्याबाबतची माहिती चुकीची आहे, ज्यामुळे ऑनलाइन देणग्या अस्वीकृत होतात. लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि अशा फसव्या संदेशांना बळी पडता कामा नये.

सशस्त्र युद्धात शहीद झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.

*वर्ष 2020 मध्ये, सरकारने 'सशस्त्र दल युद्ध दुर्घटना कल्याण निधी (AFBCWF)' स्थापन केला, ज्याचा वापर सशस्त्र लष्करी कारवायांमध्ये आपले प्राण गमावणाऱ्या किंवा गंभीर जखमी झालेल्या सैनिक/नाविक/वैमानिकांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी केला जातो. संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने भारतीय सैन्य या निधीच्या हिशोबाची देखरेख करते. सशस्त्र दले युद्ध दुर्घटना कल्याण निधीच्या खात्यात थेट योगदान दिले जाऊ शकते. बँक खात्यांचे तपशील खाली दिले आहेत:

पहिले खाते

निधीचे नाव:            सशस्त्र दले युद्ध दुर्घटना कल्याण निधी

बँकेचे नाव:             कॅनरा बँक, साउथ ब्लॉक, संरक्षण मुख्यालय नवी दिल्ली – 110011

आयएफएससी कोड:   CNRB0019055

खाते क्रमांक:            90552010165915

खात्याचा प्रकार:         बचत खाते


दुसरे खाते

निधीचे नाव:            सशस्त्र दले युद्ध अपघात कल्याण निधी

बँकेचे नाव:            भारतीय स्टेट बँक, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110011

आयएफएससी कोड:  SBIN0000691

खाते क्रमांक:          40650628094

खात्याचा प्रकार         बचत खाते

देणग्या AFBCWF च्या नावे नवी दिल्ली येथे देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे देखील दिल्या जाऊ शकतात जो टपालाने खालील पत्त्यावर पाठवता येईल:

लेखा विभाग:

सामान्य समायोजन शाखा

शिष्टाचार आणि कल्याण संचालनालय

खोली क्रमांक 281-बी, साउथ ब्लॉक

संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय (लष्कर), नवी दिल्ली – 110011

 

* * *

S.Patil/S.Naik/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2124760) Visitor Counter : 37