WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025 अॅनिमेशनपट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन ओडिया कलाकार चमकणार


जाजपूर येथील भाग्यश्री सत्पथी आणि भुवनेश्वर येथील ऋषव मोहंती त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचे दर्शन घडवणार

 Posted On: 26 APR 2025 8:19PM |   Location: PIB Mumbai

 

मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान  होणारी जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज 2025) भारतातील उदयोन्मुख सर्जनशील प्रतिभावंतांसाठी  एक प्रतिष्ठित व्यासपीठ म्हणून काम करेल. वेव्हज अंतर्गत अॅनिमेशन फिल्ममेकर स्पर्धेसाठी देशभरातून निवडलेल्या 42 अंतिम स्पर्धकांमध्ये ओदिशातील  जाजपूरची भाग्यश्री सत्पथी आणि भुवनेश्वरचा ऋषव मोहंती या दोन तरुण प्रतिभावंतांनी आपला ठसा उमटवला आहे.

जाजपूरमधील धर्मशाला येथील 22 वर्षीय चित्रपट निर्माती आणि अॅनिमेशन कलाकार भाग्यश्री सत्पथी सध्या अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) येथे शिक्षण घेत आहे.  अंतिम फेरीत दाखल झालेला तिचा "पासा" हा प्रकल्प  एक संकल्पना मालिका आहे ज्यात पौराणिक कथा आणि मनोवैज्ञानिक नाट्य यांची सांगड घातली आहे.

तिच्यासोबत एनआयडी अहमदाबादचा विद्यार्थी भुवनेश्वरचा ऋषव मोहंती आहे. त्याच्या  "खट्टी" नावाच्या अॅनिमेशन माहितीपटाने अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्याची कलाकृती कथाकथन आणि दृश्य कथानकाची  खोल समज प्रतिबिंबित करते तसेच अस्सल  आणि आकर्षक दस्तऐवजीकरणाचे माध्यम म्हणून अॅनिमेशनची क्षमता अधोरेखित करते.

वेव्हज 2025 मध्ये, अंतिम फेरीतील स्पर्धक आंतरराष्ट्रीय परीक्षक आणि जागतिक मनोरंजन उद्योगातील मातब्बर  व्यक्तींच्या एका प्रतिष्ठित पॅनेलसमोर त्यांचे प्रकल्प सादर करतील. ही स्पर्धा एक महत्त्वाची संधी प्रदान करते ज्यात अव्वल तीन विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक  मिळेल. शिवाय, हा कार्यक्रम भारताच्या अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स उद्योगाची अफाट आर्थिक क्षमता अधोरेखित करतो , जिथे एक अॅनिमेटेड चित्रपट 100 ते 300 व्यावसायिकांसाठी रोजगार निर्माण करू शकतो.

अनोखी कथाकथन शैली आणि अभिनव संकल्पनांसह, भाग्यश्री सत्पथी आणि ऋषव  मोहंती राष्ट्रीय स्तरावर ओदिशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


Release ID: (Release ID: 2124666)   |   Visitor Counter: 24