केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षा 2024 चे अंतिम निकाल जाहीर

Posted On: 22 APR 2025 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2025

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2024 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2024 च्या लेखी भागाचे निकाल आणि जानेवारी-एप्रिल 2025 मध्ये व्यक्तिमत्व चाचणीसाठी घेतलेल्या मुलाखती यांच्या आधारे ज्या उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेनुसार खालील पदांसाठी निवड झाली आहे.  त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे

(i) भारतीय प्रशासकीय सेवा;

(ii) भारतीय परदेश सेवा;

(iii) भारतीय पोलिस सेवा; आणि

(iv) केंद्रीय सेवा, गट अ आणि गट ब.

2. खालील वर्गीकरणानुसार एकूण 1009 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे:

GENERAL

EWS

OBC

SC

ST

TOTAL

335

(incl.

10 PwBD-1,

05 PwBD-2,

11 PwBD-3 & 05 PwBD-5)

109

(incl.

Nil PwBD-1,

01 PwBD-2,

Nil PwBD-3 &

Nil PwBD-5)

318

(incl.

02 PwBD-1,

02 PwBD-2,

03 PwBD-3 &

03 PwBD-5)

160

(incl.

Nil PwBD-1,

Nil PwBD-2,

Nil PwBD-3 & 01 PwBD-5)

87

(incl.

Nil PwBD-1,

Nil PwBD-2, 02 PwBD-3 & Nil

PwBD-5)

1009

(incl.

12 PwBD-1,

08 PwBD-2,

16 PwBD-3 & 09 PwBD-5)

 

3. नागरी सेवा परीक्षा नियम 2024 च्या नियम 20 (4) आणि (5) नुसार आयोगाकडून खालील प्रमाणे  उमेदवारांची एकीकृत राखीव यादी राखली जात आहे:

खुला, आर्थिक दुर्बल, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्लूबीडी-1 एकूण  115 35 59 14 06 01 230

4. परीक्षेच्या नियमांमध्ये असलेल्या तरतुदींचा योग्य विचार करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार विविध सेवांमध्ये नियुक्त्या केल्या जातील. सरकारने दिलेल्या माहितीनुसार भरती होणार असलेल्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

SERVICES GEN EWS OBC SC ST Total

I.A.S. 73 18 52 24 13 180

I.F.S. 23 05 13 09 05 55

I.P.S. 60 14 41 22 10 147

Central Services Group ‘A’ 244 57 168 90 46 605

Group ‘B’ Services 55 15 44 15 13 142

Total 455 109 318 160 87 1129*

* यामध्ये 50 PwBD पदांचा समावेश (12 PwBD-1, 08 PwBD-2, 16 PwBD-3 & 14 PwBD-5)

5. 241 शिफारसकृत उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती ठेवण्यात आली आहे.

6. एका उमेदवाराचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे.

7. हा निकाल यूपीएससीच्या http//www.upsc.gov.in. या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत परीक्षेचे गुण संकेतस्थळावर उपलब्ध असतील.

 

ठळक वैशिष्ट्ये

निकालाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • नागरी सेवा(पूर्व) परीक्षा, 2024 16 जून 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 9,92,599 उमेदवारांनी अर्ज भरले होते, ज्यापैकी प्रत्यक्षात 5,83,213 उमेदवारांनीच परीक्षा दिली.
  • यापैकी एकूण 14,267 उमेदवार सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या लेखी(मुख्य) परीक्षेला बसण्यासाठी पात्र ठरले. यापैकी 2845 उमेदवार व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरले.
  • आघाडीच्या 25 उमेदवारांमध्ये 11 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे.
  • शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये 45 व्यक्ती दिव्यांग आहेत, ज्यामध्ये 12 जण शारीरिक दिव्यांग आहेत तर 8 जण दृष्टीबाधित आहेत, 16 जण श्रवण विकलांग आहेत आणि 9 जणांना बहुविकलांगता आहे.

इंग्रजीत निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदीत निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Bedekar/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123466) Visitor Counter : 25