संरक्षण मंत्रालय
शूर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आर्मी हॉस्पिटल येथे आयोजित पहिल्या सोल्जरॅथॉनमध्ये 5000 धावपटू झाले सहभागी
Posted On:
22 APR 2025 12:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2025
नवी दिल्लीत आर्मी हॉस्पिटल जवळ 20 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या‘ रन फॉर सोल्जर्स आणि रन विथ सोल्जर्स’ या पहिल्या सोल्जरॅथॉनमध्ये 5000 पेक्षा जास्त धावपटू सहभागी झाले. सशस्त्र दलातील शूर सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आर्मी हॉस्पिटल (R&R) आणि फिटिस्तान-एक फिट भारत यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या धावण्याच्या या शर्यतीत संरक्षण दलातील सेवानिवृत्त, सैनिक, नागरिक, विद्यार्थी आणि तंदुरुस्तीविषयी जागरुक असलेले लोक एकतेची भावना आणि देशाभिमान व्यक्त करण्यासाठी एकत्र आले होते.
K2QA.jpeg)
या सोल्जरॅथॉनमध्ये तीन श्रेणींचा समावेश होता. कालमापन आधारित 10 किमी ची शर्यत,5 किमीची मौज शर्यत आणि 3 किमी चालणे अशा प्रकारांचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकांचा सहभाग आणि समावेशकता सुनिश्चित करण्यात आली.भारतीय सैनिकांच्या बरोबरीने धावण्याचा बहुमान प्राप्त करत, त्यांची शिस्त, निर्धार आणि सेवा भावना यांपासून स्फूर्ती घेण्याचा धावपटूंचा प्रयत्न राहिला.
मिझोरामचे राज्यपाल जनरल(डॉ.) व्ही. के. सिंग (निवृत्त) यांनी या शर्यतीला अधिकृतपणे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी देशभक्ती आणि अभिवादनाच्या भावनेने भरून गेलेल्या वातावरणात नौदलप्रमुख, लष्कराचे उपप्रमुख, सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक, दिल्ली विभागाचे जनरल अधिकारी कमांडिंग, डीजीएमएस (नौदल), डीजीएमएस (हवाई दल) आणि कमांडंट, आर्मी हॉस्पिटल (R&R) उपस्थित होते.
PYIN.jpeg)
पुण्यामध्ये खडकी येथील पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला मदत करण्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या सैनिकांची विशेष काळजी घेण्याचे, उपचार करण्याचे आणि त्यांना पाठबळ देण्याचे काम या केंद्रात केले जाते. ज्यांनी निस्वार्थ भावनेने देशाची सेवा केली त्यांच्या ऋणाची परतफेड करण्याच्या सामाईक बांधिलकीला या कार्यक्रमातील उत्स्फूर्त प्रतिसादाने बळकटी मिळाली.
DUD6.jpeg)
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123399)