WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मुंबईत आयोजित वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिप वाइल्डकार्ड शोडाउनला भरघोस प्रतिसाद,  50 पेक्षा जास्त सहभागी स्पर्धकांचे रंगमंचावर उत्साहाने सळसळणारे सादरीकरण 


मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथे होणाऱ्या वेव्हज शिखर परिषदेतील महाअंतिम सोहळ्यासाठी  30 वाइल्डकार्ड स्पर्धकांची निवड

 Posted On: 19 APR 2025 9:02PM |   Location: PIB Mumbai

 

जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदे (वेव्हज) अंतर्गत आज दि. 19 एप्रिल 2025 रोजी मुंबईत ठाकूर विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इथे वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिप वाइल्डकार्ड शोडाउन या धमाकेदार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील सादरीकरणांतून स्वप्ननगरी मुंबईला रुपेरी तारकांच्या मांदियाळीचे स्वरूप आले होते. क्रिएटर्स स्ट्रीट, भारतीय कॉमिक्स संघटना (आयसीए) तसेचभारतीय माध्यम आणि मनोरंजन संघटनेने (एमइएआय) संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाला भारतातील आगामी पॉप-संस्कृती महोत्सव एपीको कॉन (Epiko Con) यांचे सहयोग लाभला होता.

वेव्हज कॉस्प्ले अजिंक्यपदाच्या महाअंतिम सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून या धमाकेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त नामवंत कॉस्प्लेयर्सनी सहभाग नोंदवला. त्यांची जबरदस्त सादरीकरणे, रुपेरी पडद्याला साजेशी वेशभूषा आणि सळसळत्या उर्जेने संपूर्ण रंगमंचही उर्जेने भारून गेला होता.

व्हार्फ स्ट्रीट स्टुडिओजचे (Wharf Street Studios) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकटेश, फॉर्बिडन व्हर्सचे (Forbidden Verse) अजय कृष्णा आणि भारतीय कॉमिक्स संघटनेचे सचिव अनादी अभिलाष यांच्या परीक्षक मंडळाने 30 वाइल्डकार्ड स्पर्धकांची निवड केली. आता हे स्पर्धक 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथे होणार असलेल्या वेव्हज शिखर परिषदेतील महाअंतिम सोहळ्यात सहभागी होतील.

भारताच्या  सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे भगवान नरसिंहाच्या प्रतिरुपाचे सशक्त आणि प्रभावी सादरीकरण हे या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण ठरले.  त्याचप्रमाणे, भारतातील विस्तारत्या कॉस्प्ले क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध सेलिब्रिटी, आशय सामग्री निर्माते आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वांचा सहभागही या उपक्रमाचे ठळक आकर्षण ठरले. चाहत्यांच्या उर्जेने भारलेल्या या सोहळ्यात कलाकारांसोबत छायाचित्र घेण्याची संधी, उत्स्फुर्त सादरीकरणे आणि समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या रंजक घडामोडींच्या क्षणांनीही अनोखे रंग भरले.

उच्च उर्जा आणि उत्साहाने सळसळणारा  हा कार्यक्रम  केवळ एक पात्रता फेरी नव्हती—तर ती एक सांस्कृतिक घटना ठरली. या ठिकाणी घडलेला प्रत्येक क्षण हा भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या कॉस्प्ले क्रांतीतील समुदाय, सर्जनशीलता आणि युवकांच्या अभिव्यक्तीची ताकद दर्शवणारा होता. ‘वाइल्डकार्ड शोडाऊन’ हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला आणि त्याने आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठ्या कॉस्प्ले चळवळीसाठी वातावरण निर्मिती केली. अफलातून कलाकुसर ते प्रभावी सादरीकरणांपर्यंत, मुंबईतील हा शोडाऊन याचे जिवंत उदाहरण होता की भारतात कॉस्प्ले केवळ वाढत नाहीये—तर तो धडाक्यात फोफावत आहे.

“हा कार्यक्रम दाखवतो की भारतात कॉस्प्ले चळवळ किती प्रभावशाली होत चालली आहे,” असं एका परीक्षक सदस्याने सांगितलं. “ती खरीखुरी  ऊर्जा, तो प्रयत्न, आणि पात्रांवरील प्रेम—हे सगळं दिसून येत आहे, आणि दरवर्षी ते आणखी मोठं होत आहे,” असं ते म्हणाले.

अंतिम फेरीमध्ये संपूर्ण भारतातील सर्वोत्तम कॉस्प्लेयर्स सहभागी होतील आणि विजेत्यांना रोख बक्षिसे तसेच खास प्रदर्शनाची संधी दिली जाईल. परीक्षक मंडळात अ‍ॅनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील प्रमुख स्टुडिओंचे प्रतिनिधी असतील. या चॅम्पियनशिपचे विशेष आकर्षण म्हणजे आयसीए, फॉरबिडन वर्स, टीव्हीएजीए, एमइएआय, क्रियेटर स्ट्रीट आणि पॉप संस्कृतीची ताकद एपिको कॉन यांच्याशी झालेली  सहयोगी भागीदारी हे होय.

वेव्हज (WAVES)

भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.

वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.

काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा

ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा

चला, आमच्याबरोबर प्रवासाला! वेव्हसाठी लगेच नोंदणी करा

***

PIB TEAM WAVES 2025 | N.Chitale/T.Pawar/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


Release ID: (Release ID: 2122984)   |   Visitor Counter: 67